Banana : केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची? ‘हे’ संकेत पाहिल्यास लगेच समजेल सत्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
केळी लवकर पिकवण्यासाठी आणि ती दिसायला सुंदर बनवण्यासाठी आजकाल धोकादायक रसायनांचा वापर सर्रास केला जातोय. यामुळे केळी केवळ आपली चवच गमावत नाहीत, तर ती आपल्या पचनसंस्थेवरही गंभीर परिणाम करत आहेत.
लहान असो वा मोठे, केळ हे आपल्या सर्वांच्याच आवडीचं फळ. झटपट ऊर्जा देणारं, स्वस्त आणि वर्षभर मिळणारं हे फळ आरोग्यासाठी 'सुपरफूड' मानलं जातं. पूर्वी असं म्हटलं जायचं की, केळी हे एकमेव असं फळ आहे ज्याला भेसळीचा स्पर्श होऊ शकत नाही. पण दुर्दैवाने आज हे चित्र बदललं आहे. बाजारात मिळणारी पिवळी धमक आणि आकर्षक दिसणारी केळी तुमच्या आरोग्यासाठी 'गोड विष' ठरू शकतात.
advertisement
advertisement
रसायनांचा वापर का केला जातो?निसर्गात केळी झाडावर असताना हळूहळू 'इथिलीन' गॅस सोडतात, ज्यामुळे ती नैसर्गिकरित्या पिकतात. पण या प्रक्रियेला वेळ लागतो. व्यापार वाढवण्यासाठी उत्पादक कॅल्शियम कार्बाइड सारख्या रसायनांचा वापर करतात. हे रसायन ओलाव्याच्या संपर्कात आले की 'ॲसिटिलीन' वायू सोडते, ज्यामुळे केळी केवळ दोन दिवसात बाहेरून पिवळी पडतात.
advertisement
नैसर्गिक की रासायनिक? 'अशी' करा ओळख1. रंगाची भुरळ पडू देऊ नका: केमिकलने पिकवलेली केळी अतिशय तेजस्वी आणि 'निऑन' पिवळ्या रंगाची दिसतात. पण नैसर्गिकरित्या पिकलेली केळी सरसकट पिवळी नसतात; त्यांच्यावर छोटे तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. जर केळी प्लास्टिकच्या खेळण्यासारखी चमकत असतील, तर ती खरेदी करणं टाळा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
काय काळजी घ्याल?शक्यतो स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा लहान विक्रेत्यांकडून फळे खरेदी करा.बाजारातून थोडी हिरवी केळी आणून ती घरी नैसर्गिकरित्या पिकवणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.अतिशय चकचकीत आणि डाग नसलेली केळी पाहून आकर्षित होऊ नका.आपल्या आरोग्याची जबाबदारी आपल्याच हातात आहे. त्यामुळे केळी घेताना थोडी सतर्कता बाळगा. दिसायला सामान्य पण चवीला नैसर्गिक असलेली फळेच आपल्या कुटुंबासाठी उत्तम आहेत.









