IND vs NZ : विकेट घेताच दाखवला 4 चा आकडा, हर्षित राणाच्या सेलिब्रेशनचा अर्थ समजला का? Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात हर्षित राणाने डेवॉन कॉनवेची विकेट घेतल्यानंतर 4 आकडा दाखवून सेलिब्रेशन केलं.
रायपूर : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 208 रन करता आल्या. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्याऐवजी कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली. हर्षित राणाने त्याला मिळालेल्या या संधीचं सुरूवातीलाच सोनं केलं.
इनिंगच्या सुरूवातीच्या 2 ओव्हर अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने टाकल्या. या दोन्ही ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे दोन्ही ओपनर डेवॉन कॉनवे आणि टीम सायफर्ट यांनी आक्रमक बॅटिंग केली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा स्कोअर 40 रन पार गेला होता, त्यामुळे सूर्यकुमार यादवने हर्षित राणाच्या हातात बॉल दिला.
हर्षित राणाने कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला आणि आपल्या पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला डेवॉन कॉनवेची विकेट घेतली. हर्षितने टाकलेल्या बॉलवर कॉनवेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल हवेत गेला आणि हार्दिक पांड्याने कॅच पकडला. कॉनवेची विकेट घेतल्यानंतर हर्षित राणाने ड्रेसिंग रूमच्या दिशेने बोटांनी 4 आकडा दाखवून सेलिब्रेशन केलं.
advertisement
Harshit Rana Varun Chakaravarthy
Both strike in their first over as #TeamIndia get the wickets of both #NZ openers
Updates https://t.co/8G8p1tq1RC#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/eOFfUuFkar
— BCCI (@BCCI) January 23, 2026
advertisement
हर्षित राणाने 4 आकडा नेमका का दाखवला? असा प्रश्न चाहत्यांना पडला. याआधी वनडे सीरिजमध्ये तीनही सामन्यांमध्ये हर्षित राणानेच कॉनवेची विकेट घेतली होती. आता टी-20 सीरिजमध्येही कॉनवेला पुन्हा एकदा हर्षितनेच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. संपूर्ण दौऱ्यात 4 वेळा कॉनवेची विकेट घेतल्यामुळे हर्षितने 4 आकडा दाखवून सेलिब्रेशन केलं.
9 बॉलमध्ये 19 रन करून डेवॉन कॉनवे आऊट झाला, तर सायफर्टने 13 बॉलमध्ये 24 रन केले. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने 27 बॉलमध्ये नाबाद 47 रनची खेळी केली. याशिवाय रचिन रवींद्रने 26 बॉलमध्ये 46 रन केले. भारताकडून कुलदीप यादवला 2 विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
Location :
Raipur,Raipur,Chhattisgarh
First Published :
Jan 23, 2026 9:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : विकेट घेताच दाखवला 4 चा आकडा, हर्षित राणाच्या सेलिब्रेशनचा अर्थ समजला का? Video








