advertisement

थिएटरमध्ये 'बॉर्डर 2' चा डंका, OTT वरही एंटरटेनमेंटचा धमाका; वीकेंडला या 7 सीरिज-फिल्म पाहाच

Last Updated:
OTT Release This Week :  सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांचा बॉर्डर 2 हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. पण मनोरंजनाचा हा डोस केवळ थिएटरपुरता मर्यादित नाही. या आठवड्याच्या शेवटी अनेक चित्रपट आणि मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज झाल्या आहेत. बॉर्डर 2 पहिल्यानंतर घरी बसूनही ओटीटीवरील हे 7 चित्रपट आणि सीरिज तुम्ही पाहू शकता.
1/8
या आठवड्यात नेटफ्लिक्सपासून जिओ हॉटस्टारपर्यंतचे प्लॅटफॉर्म अॅक्शन, रोमान्स आणि सस्पेन्सनं भरलेलं आहेत. धनुष आणि कृती सॅननचा बहुप्रतिक्षित चित्रपट
या आठवड्यात नेटफ्लिक्सपासून जिओ हॉटस्टारपर्यंतचे प्लॅटफॉर्म अॅक्शन, रोमान्स आणि सस्पेन्सनं भरलेलं आहेत. धनुष आणि कृती सॅननचा बहुप्रतिक्षित चित्रपट "तेरे इश्क में" आधीच ओटीटीवर रिलीज झाला आहे, तर "मस्ती ४" ची कॉमेडी देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
advertisement
2/8
मार्क: ही कथा अजय (किच्चा सुदीप) भोवती फिरते. अजय हा एक रागीट पोलीस अधिकारी आहे जो निलंबित होतो. पण जेव्हा एक बालकांचे अपहरण करणारी टोळी आणि एक शक्तिशाली औषध कार्टेल शहराला धमकावते तेव्हा त्याला पुन्हा ड्युटीवर बोलावले जाते. त्यांना संपवण्यासाठी त्याच्याकडे फक्त 36 तास आहेत. हा सिनेमा 23 जानेवारी रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.

3/8
स्टील: ही सीरिज एका गुंतवणूक फर्ममध्ये काम करणारी झारा (सोफी टर्नर) हिची आहे. झारा नकळत एका मोठ्या सशस्त्र दरोड्यात अडकते, ज्यामुळे तिला 4 अब्ज पौंड पेन्शन फंड बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाते. ही सीरिज 21 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे.

4/8
सिराई: हा सिनेमा लेखकाच्या पोलीस सेवेतील वास्तविक जीवनातील अनुभवांवर आधारित आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सेट केलेला हा सिनेमा पोलिसांच्या कठोर आणि अशांत कामाच्या पद्धती अत्यंत वास्तववादी पद्धतीने चित्रित करण्यात आला. सिराई हा सिनेमा 23 जानेवारीपासून जिओ हॉटस्टारवर रिलीज झाला ाहे.  

5/8
स्पेस झेन - चंद्रयान: खऱ्या घटनांनी प्रेरित ही सीरिज आहे.  इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या संघर्षांचे चित्रण या सीरिजमध्ये करण्यात आलं आहे. चंद्रयान-2 च्या अपयशानंतर त्यांना प्रचंड दबावाचा सामना करावा लागला, परंतु त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले आणि त्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 च्या ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंगसह भारताचा झेंडा फडकवला. ही सीरिज 23 जानेवारी रोजी जिओहॉटस्टारवर रिलीज झाली आहे. 

6/8
स्पेस झेन - चंद्रयान: खऱ्या घटनांनी प्रेरित ही  सिरीज आबे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या संघर्षांचे चित्रण करण्यात आलं. मस्ती 4: मस्ती फ्रँचायझीमधील हा चौथा सिनेमा आहे. ज्यामध्ये विवाहित मित्र अमर, मीत आणि प्रेम परत येत आहेत. त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी ते त्यांच्या पत्नींकडून एका आठवड्याची स्वातंत्र्य मागतात. परंतु त्यांच्या पत्नी त्यांच्यावर कारवाई करतात तेव्हा त्यांचे त्रास वाढतात. हा विनोदी सिनेमा 23 जानेवारी रोजी ZEE5 वर रिलीज झाला आहे. 

7/8
तेरे इश्क में: ही दिल्लीतील विद्यार्थी कार्यकर्त्या शंकरची कथा आहे. जेव्हा तो एक कॉलेज गोईंग मुलगी मुक्तीच्या प्रेमात पडतो आणि त्याचं आयुष्य एक वळण घेते. त्यांचे मार्ग एकमेकांशी जोडले जातात. परंतु एकाच क्षणात सर्वकाही विस्कळीत होतं. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

8/8
अ नाईट ऑफ द सेव्हन किंग्डम्स: जॉर्ज आर.आर. मार्टिन यांच्या
अ नाईट ऑफ द सेव्हन किंग्डम्स: जॉर्ज आर.आर. मार्टिन यांच्या "अ सॉन्ग ऑफ आइस अँड फायर" युनिव्हर्स (गेम ऑफ थ्रोन्स) मधील ही तिसरी लाईव्ह-अ‍ॅक्शन सीरिज आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे. 19 जानेवारी रोजी ही सीरिज जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement