Washing Machine : 'या' वेळेत वॉशिंग मशिन वापराल तर विजेचं बिल येईल थेट अर्ध; एक्सपर्ट्सनं सांगितली Hidden Trick
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरं तर, वॉशिंग मशीन कधी आणि कशी चालवावी, याच्या काही खास वेळा आणि नियम असतात. जर तुम्ही चुकीच्या वेळी मशीन लावत असाल, तर तुमचं वीज बिल दुप्पट येऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया, वीज वाचवण्याचे ते 'स्मार्ट' मार्ग.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात घरकामासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी आपलं काम खूप सोपं केलं आहे. मग ते स्वयंपाकघरातील मिक्सर असो किंवा कपडे धुण्याची वॉशिंग मशीन. पूर्वी तासनतास लागणारे कपडे धुण्याचे काम आता अवघ्या काही मिनिटांत बटण दाबून पूर्ण होते. पण, हेच सुख कधीकधी महिनाअखेरीस खिशाला कात्री लावू शकतं.
advertisement
अनेकदा आपल्याला वाटतं की आपण तर मशीन फक्त तासाभरासाठीच वापरली, मग वीज बिल इतकं कसं वाढलं? खरं तर, वॉशिंग मशीन कधी आणि कशी चालवावी, याच्या काही खास वेळा आणि नियम असतात. जर तुम्ही चुकीच्या वेळी मशीन लावत असाल, तर तुमचं वीज बिल दुप्पट येऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया, वीज वाचवण्याचे ते 'स्मार्ट' मार्ग.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अनेकजण कपडे स्वच्छ निघतील या विचाराने मशीनमध्ये 'हॉट वॉटर'चा पर्याय निवडतात. पण तुम्हाला माहितीये का? वॉशिंग मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण विजेपैकी 90% वीज फक्त पाणी गरम करण्यासाठी खर्च होते. त्यामुळे जोपर्यंत कपडे खूपच घाण नसतील, तोपर्यंत 'कोल्ड वॉश' किंवा थंड पाण्याचा पर्याय निवडा. यामुळे विजेची मोठी बचत होईल.
advertisement
वॉशिंग मशीनमधील 'ड्रायर' हा वॉशरपेक्षा कितीतरी पटीने जास्त वीज खातो. उन्हाळ्यात ड्रायर वापरल्याने घरात उष्णता आणि आर्द्रता वाढते, ज्यामुळे तुमचा एसी (AC) जास्त वेळ चालवावा लागतो. उन्हाळ्यात कपडे नैसर्गिक उन्हात वाळवा. यामुळे कपड्यांचा ताजेपणा टिकतो आणि वीजही वाचते. ड्रायरचा वापर फक्त पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात गरज असेल तेव्हाच करा.
advertisement
advertisement
कमाल बचतीसाठी 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवा:फुल लोड: फक्त दोन-तीन कपड्यांसाठी मशीन लावू नका. मशीन पूर्ण भरेल इतके कपडे झाल्यावरच वॉश सायकल सुरू करा.डिटर्जंटचा योग्य वापर: जास्त फेस झाल्यामुळे मशीनला जास्त वेळ चालावे लागते, त्यामुळे योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरा.व्हेंटिलेशन: मशीन असलेल्या ठिकाणी हवेची ये-जा चांगली ठेवा, जेणेकरून तिथे ओलावा साचणार नाही.मेंटेनन्स: मशीनचे फिल्टर वेळोवेळी साफ करा, जेणेकरून मशीनवर ताण येणार नाही.
advertisement







