जालन्याच्या शेतकऱ्याचा मोठा सन्मान, प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं खास निमंत्रण, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Republic Day 2026: छोट्या गावातील एका शेतकऱ्याला राष्ट्रपती भवनात उपस्थित राहण्याचा मान मिळणे हे संपूर्ण जालना जिल्हा आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
जालनाः 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या सोहळ्यात सहभागी होण्याचा मान जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला मिळाला आहे. छोटेखानी धांडेगाव (मौजेपुरी) येथील साधारण शेतकरी बळीराम भाऊराव लहाने यांना प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाकडून विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे. हे निमंत्रण ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत बळीराम लहाने यांच्या शेतात जीके सोलर कंपनीमार्फत सौर पंप बसवण्यात आला. यापूर्वी वीज नसल्याने किंवा वीज खंडित होण्यामुळे रात्री-अपरात्री पाण्यासाठी धावपळ करावी लागायची. आता सौर ऊर्जेवर दिवसा सहज पाणी मिळते. त्यामुळे शेतीचे काम नियोजित, सुरक्षित आणि कार्यक्षम झाले आहे, असं बळीराम लहाने यांनी सांगितले.
advertisement
सौरपंप बसविल्याने वीज बिलात मोठी बचत, पाण्याचा कार्यक्षम वापर, उत्पादनात वाढ आणि पर्यावरणस्नेही शेतीकडे वाटचाल असे फायदे त्यांना झाले आहेत. हे निमंत्रण केवळ बळीराम लहाने यांचे वैयक्तिक यश नाही, तर कुसुम सोलर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे ठळक उदाहरण आहे. धांडेगावासारख्या छोट्या गावातील एका शेतकऱ्याला राष्ट्रपती भवनात उपस्थित राहण्याचा मान मिळणे हे संपूर्ण जालना जिल्हा आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
advertisement
या यशोगाथेने अनेक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा योजना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि ग्रामीण भागात शाश्वत शेतीची नवी दिशा उघडेल.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 6:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालन्याच्या शेतकऱ्याचा मोठा सन्मान, प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं खास निमंत्रण, Video






