Navi Mumbai News: मुलगी एकटी दिसताच वॉचमनची विकृती, धक्कादायक प्रकार;13 वर्षीय मुलीसमोर सुरक्षा रक्षकाचे घाणेरडे कृत्य
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने 13 वर्षीय मुलीसमोर गैरकृत्य करण्याचा प्रकार नवी मुंबईमध्ये घडला आहे. 55 वर्षीय सुरक्षा रक्षकाने या अल्पवयीन मुलीसमोरच विचित्र प्रकार केला आहे.
इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला 13 वर्षीय मुलीसमोर गैरकृत्य करणे चांगलेच महागले आहे. नवी मुंबईमध्ये घटना घडली असून 55 वर्षीय सुरक्षा रक्षकाने 13 वर्षीय मुलीसमोर गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. 13 वर्षीय मुलीच्या आई- वडिलांनी त्या सुरक्षा रक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास केला जात आहे. ही घटना गुरूवारी (22 जानेवारी) दुपारी घडली आहे.
13 वर्षीय मुलगी राहत असलेल्या इमारतीचा सुरक्षा रक्षक म्हणून तो व्यक्ती काम करतो. गुरूवारी (22 जानेवारी) दुपारी ती मुलगी इमारतीच्या आवारातून जात होती. त्यावेळी ती एकटीच होती. ती एकटीच असल्याची संधी साधून तिच्या समोर त्या सुरक्षा रक्षकाने गैरकृत्य केले. सुरक्षा रक्षकाचे कृत्य पाहून ती मुलगी देखील घाबरली होती. घाबरलेल्या 13 वर्षीय मुलीने आई- वडिलांना घरी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तिच्या घरच्यांनी लगेचच वेळ न दवडता त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.
advertisement
मुलीच्या आई- वडिलांच्या सांगण्याप्रमाणे पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास केला जात आहे. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केलेली असून त्याच्या कडून संपूर्ण घटना जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबईमध्ये ही घटना घडली असून सध्या पालकांकडून आपल्या मुलीची विशेष काळजी घेतली जात आहे. राहत असलेल्या सोसायटीमध्येच महिला असुरक्षित असल्यामुळे आई- वडिलांकडून सुरक्षेबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 6:58 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Navi Mumbai News: मुलगी एकटी दिसताच वॉचमनची विकृती, धक्कादायक प्रकार;13 वर्षीय मुलीसमोर सुरक्षा रक्षकाचे घाणेरडे कृत्य









