TRENDING:

'तिकडं येऊ का' म्हणणारा किंगमेकर भैय्या गायकवाड मारहाणीनंतर सरळ, आता म्हणतोय 'तुम्ही इकडे या'

Last Updated:

Reelstar Bhaiya Gaikwad News: 'हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष' अशी दमबाजी करणारा रिलस्टार भैय्या गायकवाडला छत्रपती संभाजीनगरमधील एका टोलनाक्यावर बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छ.संभाजीनगर : 'हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष' अशी दमबाजी करत 'काम होतं की नाही? का मी येऊ तिकडे' अशी दमबाजी करणारा रिलस्टार भैय्या गायकवाडला छत्रपती संभाजीनगरमधील एका टोलनाक्यावर बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. टोल भरण्यावरून झालेल्या वादातून टोल कर्मचाऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
News18
News18
advertisement

टोल नाक्यावर नेमकं काय घडलं?

भैय्या गायकवाड हा एका मित्रासोबत कारने प्रवास करत असताना त्याची कार सावंगी समृद्धी टोलनाक्यावर (छत्रपती संभाजीनगर) पोहोचली. भैय्या गायकवाडच्या कारला फास्ट टॅग नसल्याने त्याला टोलचे शिल्लक पैसे द्यायचे होते. याचवेळी भैय्या गायकवाड गाडीतून खाली उतरला आणि त्याने आपल्या नेहमीच्या 'स्टाईल'मध्ये टोल कर्मचाऱ्यांशी बोलण्यास सुरुवात केली.

advertisement

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, भैय्या गायकवाडने टोल कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारावरून डिवचले आणि दमबाजी केली. फास्ट टॅग नसताना टोलचे पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच कर्मचाऱ्यांना उलट दमदाटी केली. यामुळे टोल कर्मचारी कमालीचे संतप्त झाले. त्यानंतर सहा कर्मचाऱ्यांनी मिळून भैय्या गायकवाडला बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना, 'माझा व्हिडिओ तरी डिलीट करा,' अशी विनवणी गायकवाड करत असल्याचेही एका व्हिडिओत दिसत आहे.

advertisement

मारहाणीनंतर भैय्या गायकवाडची उघड धमकी

मारहाणीनंतर भैय्या गायकवाड गप्प बसला नाही. त्याने तातडीने एक रिल व्हिडिओ बनवून मारेकऱ्यांना उघड धमकी दिली आहे. या रिलमध्ये त्याने आर्वाच्च भाषेचा वापर करत म्हटले आहे की, "तुम्ही आम्हाला जेवढं मारलंय ना, याचा बदला नाही घेतल्याशिवाय राहणार नाही... तुम्ही फक्त इकडे या. ही फक्त जाहिरात होती, पिक्चर अजून बाकी आहे."

advertisement

नेमकी धमकी काय दिली?

किंगमेकर ग्रुप फेम भैय्या गायकवाड रिलमध्ये म्हणाला, "अरे जळू नका बरोबरी करा. परवा मी सिल्लोडला गेलो होतो. तिकडे सरपंच मंगेशदादा साबळे उपोषणाला बसले होते, त्यांना भेटायला गेलो होतो. तिकडून परत येताना, तुम्ही माझा पाठलाग केला. समृद्धी हायवेने जाताना तुम्ही मला टोलनाक्यावर मारलं. तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे, तुम्ही जळू नका बरोबरी करा. आणि काय रे तुम्हाला जिपची आणि थारची काय लेव्हल माहीत आहे का? सांगणं एवढंच आहे, तुम्ही आम्हाला जेवढं मारलंय ना, याचा बदला नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त इकडे या. मित्रानो मला थोडंच लागलंय. काही झालं नाही. ही फक्त जाहिरात होती, पिक्चर अजून बाकी आहे," अशी धमकी भैय्या गायकवाडने दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत अनारसे बिघडणार नाहीत! या टिप्स लक्षात ठेवा अन् खुसखशीत रेसिपी बनवा!
सर्व पहा

या धमकीमुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात टोल कर्मचाऱ्यांनी किंवा भैय्या गायकवाडने अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र, सोशल मीडियावर भैय्या गायकवाडला झालेला चोप आणि त्यानंतरची धमकी दोन्ही व्हिडिओ खूप चर्चेत आहेत. तसेच सोशल मीडियावर 'मी तिकडे येऊ का?' अशी दमबाजी करणारा किंगमेकर आता 'तुम्ही इकडे या'असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे भैय्या गायकवाडला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'तिकडं येऊ का' म्हणणारा किंगमेकर भैय्या गायकवाड मारहाणीनंतर सरळ, आता म्हणतोय 'तुम्ही इकडे या'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल