सध्या असंच एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. यात 25 वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली. 25 वर्षीय शेख अहेशा परवीन शेख अलमगीर हिने फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलं होतं. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला. मात्र, पुढे कौटुंबिक कलह सुरू झाले. यामुळे ती आपल्या माहेरी राहात होती. यादरम्यान अचानक एक दिवस तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. याबाबत बोलताना तिच्या वडिलांनी सांगितलं, की कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट असताना महिलेच्या पतीने तिला आपल्या दुसऱ्या पत्नीचे फोटो पाठवले होते. याच तणावातूनच तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पतीने दुसऱ्या पत्नीचे फोटो मोबाईलवर पाठवल्यानंतर तणावाखाली येऊन तरुणीने आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबाचा आरोप आहे. मात्र, कुटुंबाचा जबाब नोंदवल्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण समोर येईल, असं तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल बबन शिंदे यांनी सांगितलं आहे.
