छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सर्व महिलांकडून अगोदर फॉर्म भरून घेण्यात आले होते. आता रक्षाबंधन काही दिवस बाकी असताना या लाडक्या बहिणींचा पहिला हप्ताह महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातीलही हजारो महिलांचा खात्यावर हे पैसे जमा झाले आहेत. यानंतर महिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या सर्व बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा केलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यासोबत येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही त्यांनाच निवडून देणार आहोत. हे पैसे आल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे, अशी प्रतिक्रिया मनीषा मुंढे या महिलेने दिली.
ई पीक पाहणीचं स्टेटस चेक करण्यासाठी लागतात फक्त 15 रुपये, कसं चेक करणार?, अगदी सोप्पंय, VIDEO
हे जे पैसे आमच्या खात्यात जमा झालेले आहेत. ते मी घर कामासाठी वापरणार आहे आणि राखी पौर्णिमेच्या अगोदर हे पैसे आमच्या खात्यात जमा झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांनाच मतदान करणार आहोत. हे पैसे मी देवासाठी वापरणार आहे. आणि येणाऱ्या मतदानामध्ये एकनाथ शिंदे यांना मतदान देणार आहे. आम्हाला तेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, खात्यात पैसे आल्यामुळे सर्व महिला या आनंदी आहेत.
रक्षाबंधनाची सरकारकडून महिलांना खास भेट मिळत आहे. पात्र महिलांना राज्य सरकार तीन हजार रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे. तो हप्ता थेट बँक खात्यात जमा होत आहे.