TRENDING:

संभाजीनगर: मित्राला भेटायला लॉजवर गेली, 105 ऐवजी 205 रुमचं दार ठोठावलं, तिघांनी आत ओढून रात्रभर केला अत्याचार

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका लॉजवर एका विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका लॉजवर एका विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने बिअर पाजून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला आहे. पीडित महिला संबंधित लॉजवर आपल्या मित्राला भेटायला आली होती. पण तिने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावल्याने हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

या प्रकरणी पीडितेनं वेदांतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. घनश्याम भाऊलाल राठोड (२७), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (२५, दोघेही रा. न्यू शांतिनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी) आणि किरण लक्ष्मण राठोड (२५, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. एका विवाहित महिलेवर तीन जणांनी अशाप्रकारे लॉजवर अत्याचार केल्याने संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आबे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय पीडित महिला विवाहित असून घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी ती आपल्या मित्राला भेटायला गेली होती. तिला पैशांची गरज असल्याने तिने मित्राकडे पैसे मागितले होते. त्या मित्राने तिला बुधवारी रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. बूक केलेल्या १०५ क्रमांकाच्या रूममध्ये दोघांनी मद्यप्राशन आणि जेवण केलं. रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडिता फोनवर बोलत हॉटेलच्या बाहेर आली आली. फोनवर बोलून झाल्यानंतर ती परत आल्यावर तिने चुकून १०५ ऐवजी २०५ क्रमांकाच्या रूमचे दार ठोठावले.

advertisement

त्या रूममध्ये तिघेजण आधीपासून मद्यपान करत होते. तिघांनी तिला रूममध्ये ओढून दार लावून घेतले. त्यानंतर बळजबरीने तिला बिअर पाजून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान पीडितेने आरोपींच्या तावडीतून सुटका करत दरवाजा उघडून आरडाओरड केली. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले.

सीसीटीव्हीमुळे 3 तासांत तिन्ही आरोपींना बेड्या

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीच्या शोधात केली भटकंती, शेवटी तरुणानं घेतला शेतीचा निर्णय, आता लाखात कमाई
सर्व पहा

आरोपी घनश्याम, ऋषिकेश, किरण तिघेही अविवाहित आहेत. दोघेजण एका फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतात. ऋषिकेश हा खाजगी काम करतो. त्याचे शिक्षणही सुरू आहे. सकाळी हॉटेलमधून पळून गेल्यानंतर आरोपींनी मोबाइल बंद करून ठेवले होते. हॉटेल बुकिंग करताना दिलेले नाव, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ३ तासांत जिन्सी, मोंढा आणि भानुदासनगर तिघांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगर: मित्राला भेटायला लॉजवर गेली, 105 ऐवजी 205 रुमचं दार ठोठावलं, तिघांनी आत ओढून रात्रभर केला अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल