TRENDING:

Sambhajinagar: तक्रार द्यायला गेली अन् जाळ्यात अडकली, 58 वर्षांच्या पोलीस अधिकाऱ्याचा 23 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने २३ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने २३ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केला आहे. पीडित तरुणी मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळी आरोपीनं तिचा मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला. यानंतर तिच्याशी संपर्क साधून तिला भेटायला बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचा तीनवेळा गर्भपात देखील घडवून आणला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
प्रातिनिधीक फोटो (AI generated)
प्रातिनिधीक फोटो (AI generated)
advertisement

सुभाष चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. त्याच्यासोबत पत्नी आणि मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष चव्हाण हे क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. मागील एक वर्षांपासून ते सातत्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करत होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडितेनं तक्रारीत काय म्हटलं?

advertisement

“मी मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या पुण्यात खासगी नोकरी करते. मार्च २०२५ मध्ये माझा मोबाइल हरवल्याने मी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. तिथं माझी भेट पीएसआय सुभाष चव्हाण यांच्याशी झाली. त्यांनी माझा नंबर नोंदवून घेतला आणि त्याच रात्री फोन केला. त्यानंतर आमच्यात फोनवर बोलणं सुरू झालं आणि त्यांनी मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. काही दिवसांनी त्यांनी माझा मोबाइल सापडल्याचं सांगून मला संभाजीनगरला बोलावलं. एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेल्यावर त्यांनी मला माझ्या जातीबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांनी मला लग्नाचे आमिष दाखवले. ‘मी तुझ्याशी लग्न करेन, तुला कधीच सोडणार नाही,’ असं म्हणत त्यांनी माझा विश्वास संपादन केला आणि शहरातील विविध लॉजवर नेऊन माझ्यावर वारंवार अत्याचार केले. त्यांनी मला अहिल्यानगर (अहमदनगर) येथे नेऊन गळ्यात बनावट मंगळसूत्र बांधून ‘आता तू माझी बायको आहेस,’ अशी खोटी हमी दिली.

advertisement

पुण्यात पहिल्यांदा घडवला गर्भपात

मी गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी माझी इच्छा नसताना पुण्यात माझा पहिला गर्भपात घडवून आणला. नोव्हेंबर २०२५ मध्ये संभाजीनगरमध्ये खोटं सांगून त्यांनी माझा दुसरा गर्भपात केला. जेव्हा मी लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्यांनी मला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

पोटावर लाथा घालून तिसरा गर्भपात

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

“जानेवारी २०२६ मध्ये मी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आले असता, त्यांनी मला जातीवरून हीन वागणूक दिली. ‘मी उच्च जातीचा असून, तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करणार नाही,’ असं म्हणत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलानंही मला गाठून मारहाण केली. आरोपीच्या पत्नीनं ‘माझ्या पतीचा पाठलाग सोडून दे,’ असं म्हणत पोटावर मारहाण केली. ज्यामध्ये माझा तिसऱ्यांदा गर्भपात झाला. सततची फसवणूक आणि शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून अखेर मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sambhajinagar: तक्रार द्यायला गेली अन् जाळ्यात अडकली, 58 वर्षांच्या पोलीस अधिकाऱ्याचा 23 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल