हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकीचा चुराडा झाला. तर स्कॉर्पिओच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं. स्कॉर्पिओमधील तीन जण जखमी झाले आहेत. भीषण अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
दुचाकीवर एक पुरुष, एक महिला आणि एक लहान बाळ असे तिघे होते. या तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातामुळे काहीवेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी ही वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओमधील तीन प्रवासीही जखमी झाले असून, त्यांना तातडीने वैजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
advertisement
सजन राजू राजपूत (२८), शितल राजू (२२), आणि त्यांचा मुलगा कृष्ण अंश सजन (१ ) अशी त्यांची नावे आहेत. गंगापूर आणि वाळुज परिसरात एकच खळबळ उडाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सजन राजू राजपूत हे वैजापूर तालुक्यातील सटाणाहुन गंगापूर मार्गे वाळूजकडे मोटारसायकल वर जात होते. त्याचवेळी गंगापूरहुन वैजापूरकडे येणाऱ्या स्कार्पिओ कारला समोरासमोर धडक झाली मोटरसायकल वर सजन राजू राजपूत (२८), शितल राजू (२२), आणि त्यांचा मुलगा कृष्ण अंश सजन (१ ) हे तिघे गंगापूर तालुक्यातील वाळूज येथील रहिवासी आहे. हे प्रवास करत होते.
स्कार्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे शिल्लेगाव पोलिसांनी सांगितले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार विनोद बिघेत,पो. हनुमान सातपुते हे करत आहे. अख्खं कुटुंब या अपघातात मृत्युमुखी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दुचाकीस्वार किंवा स्कॉर्पिओवाला कोणी चुकीच्या बाजूने येत होते का याचाही तपास केला जात आहे.