TRENDING:

Kolhapur News: जिकडे-तिकडे 'चपलाच चपला', 10 ट्रॅक्टर भरून उचलला चपलांचा ढीग; 25 तासांत कोल्हापूर स्वच्छ!

Last Updated:

Kolhapur News : गणेशोत्सवाचा उत्साह संपल्यानंतर आता कोल्हापूर शहर स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kolhapur News : गणेशोत्सवाचा उत्साह संपल्यानंतर आता कोल्हापूर शहर स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका संपताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून मिरवणूक मार्गावरील कचरा आणि चपलांचे ढिग तातडीने उचलले. जवळपास 25 तासांहून अधिक काळ ही स्वच्छता मोहीम सुरू होती.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

'स्वच्छ कोल्हापूर'साठी अहोरात्र मेहनत

विसर्जनाची मिरवणूक संपताच महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्य मिरवणूक मार्गाची सफाई सुरू केली. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, गंगावेश अशा अनेक प्रमुख रस्त्यांवर पडलेला चपलांचा ढिग आणि इतर कचरा उचलण्यात आला. या कामासाठी 10 ट्रॅक्टरहून अधिक गाड्या लागल्या आणि तब्बल 10 ट्रॉलींपेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात आला.

advertisement

गणपती मूर्ती आणण्यासाठी 100 टेम्पो

याव्यतिरिक्त, विसर्जन स्थळांवरही विशेष नियोजन करण्यात आले होते. कृत्रिम कुंड आणि इराणी खण अशा ठिकाणी पवडी, आरोग्य, विद्युत, उद्यान आणि इतर विभागांचे तीन हजार कर्मचारी सकाळपासूनच कामावर होते. वैद्यकीय पथके आणि अग्निशमन दलाची पथकेही मदतीसाठी तैनात होती. गणपती मूर्ती आणण्यासाठी 100 टेम्पो आणि विसर्जनासाठी 415 हमाल कार्यरत होते. या सर्वांनी अहोरात्र काम करून शहराची स्वच्छता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

advertisement

हे ही वाचा : कर भरा, तक्रार करा... घरबसल्या 100 सुविधा मिळणार एका क्लिकवर; इचलकरंजी महापालिकेने सुरू केलीय 'ही' सेवा 

हे ही वाचा : तयारी झाली, पण आरक्षणाचं काय? कोल्हापूर झेडपीच्या इच्छुकांचं वाढलं टेन्शन; 'या' तारखेनंतर बदलणार राजकीय गणितं!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur News: जिकडे-तिकडे 'चपलाच चपला', 10 ट्रॅक्टर भरून उचलला चपलांचा ढीग; 25 तासांत कोल्हापूर स्वच्छ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल