तयारी झाली, पण आरक्षणाचं काय? कोल्हापूर झेडपीच्या इच्छुकांचं वाढलं टेन्शन; 'या' तारखेनंतर बदलणार राजकीय गणितं!

Last Updated:

Kolhapur ZP Election : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी आणि इच्छुकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. निवडणुकीच्या...

Kolhapur ZP Election
Kolhapur ZP Election
Kolhapur ZP Election : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी आणि इच्छुकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. निवडणुकीच्या आरक्षणाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रारूप आराखड्यावर दाखल झालेल्या हरकतींवर 15 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
न्यायालयीन लढाईमुळे संभ्रम
जिल्हा परिषदेच्या प्रारूप आराखड्यावर विभागीय आयुक्तांनी हरकती फेटाळून लावल्या होत्या. मात्र, या निर्णयाविरोधात हरकतदारांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयावरच अंतिम आराखड्याचे भवितव्य अवलंबून आहे.
इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार
या निकालामुळे मतदारसंघांमध्ये उमेदवारांसाठी आरक्षण कसे निश्चित होते, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये सध्या संभ्रम आहे. त्यांनी आपापल्या मतदारसंघात लोकांच्या आणि गणेश मंडळांच्या भेटीगाठी घेऊन जोरदार तयारी सुरू केली आहे. पण न्यायालयाच्या निकालानंतरच उमेदवारीची दिशा ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष या न्यायालयीन प्रक्रियेवर लागले आहे.
advertisement
न्यायालयाचा निकाल उमेदवारांचे राजकीय गणित बदलू शकते. त्यामुळे, जिल्हा परिषदेच्या आरक्षणाबाबतचा अंतिम निर्णय 15 सप्टेंबरच्या सुनावणीनंतरच होणार असून, तोपर्यंत सर्व इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तयारी झाली, पण आरक्षणाचं काय? कोल्हापूर झेडपीच्या इच्छुकांचं वाढलं टेन्शन; 'या' तारखेनंतर बदलणार राजकीय गणितं!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement