Eknath Shinde Devendra Fadnavis : 'देवाचा न्याया'वर भाजप-शिंदेंगटात अध्यात्मिक संघर्ष, देवाचं' राज्य नसताना 'एकनाथां'नी...''

Last Updated:

Eknath Shinde Devendra Fadnavis : भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या अध्यात्मिक आघाडीत आता ही कुरघोडी पोहचली असल्याचे म्हटले जात आहे.

'देवाचा न्याया'वर  भाजप-शिंदेंगटात अध्यात्मिक संघर्ष, देवाचं' राज्य नसताना 'एकनाथां'नी...''
'देवाचा न्याया'वर भाजप-शिंदेंगटात अध्यात्मिक संघर्ष, देवाचं' राज्य नसताना 'एकनाथां'नी...''
मुंबई: महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. मात्र, महायुतीचे नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सगळं काही आलबेल असल्याचे सांगतात. मात्र, या तिन्ही पक्षांमधील दुसऱ्या आणि तिसर्‍या फळीतील नेत्याकडून कुरघोडी सुरू असल्याचे दिसून येते. भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या अध्यात्मिक आघाडीत आता ही कुरघोडी पोहचली असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. “महाराष्ट्रात फक्त देवाचा न्याय चालेल, नो भाईगिरी अँड नो दादागिरी!” असे त्यांनी लिहिले असून, या विधानामध्ये त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसले तरी राजकीय उपरोध स्पष्ट दिसून आला. भाजप कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘देवाभाऊ’ म्हणून संबोधले जाते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भाई’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘दादा’ अशी ओळख आहे. त्यामुळे तुषार भोसले यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वशैलीवरच निशाणा साधल्याचे मानले जात आहे.
advertisement
त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असलेल्या शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांची पोस्ट चर्चेत आली आहे. अक्षय महाराज भोसले यांनी 'देवाचं' राज्य नसताना 'एकनाथां'नी सर्वोतोपरी देवास सनाथ केले असल्याचे म्हटले आहे.

अक्षय महाराज यांनी काय म्हटले?

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी पोस्ट केल्यानंतर अक्षय महाराज यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना प्रत्युत्तर दिले असल्याची चर्चा रंगली आहे. अक्षय महाराज यांनी म्हटले की, 'देवाचं' राज्य नसताना 'एकनाथां'नी सर्वोतोपरी देवास सनाथ केले असल्याचे सांगत आमुचिया भावें तुज 'देव'पण । तें कां विसरोन राहिलासी ॥ अशी संतवाणी लिहिली.
advertisement
त्यांनी पुढं म्हटले की, संत श्री 'एकनाथ' महाराजांच्या घरी देव राबत असे. अगदी श्री तुकाराम महाराजांच्या पर्यंत अनेकदा संतांना देवाला सांगावे लागले आहे. संतांच्या प्रयत्नामुळे भक्तीभावामुळे अर्थात संतांवर असणाऱ्या समाजाच्या विश्वासामुळे तुला देवपणा आले आहे. हे देवा तू विसरून गेला आहेस की काय? अशी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अक्षय महाराज भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.
advertisement

भाजप-शिंदे गटाच्या अध्यात्मिक आघाडीत संघर्ष?

शिंदे गटाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असलेले अक्षय महाराज यांनी आता थेट भाजपच्या तुषार भोसले यांना प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही पक्षांच्या अध्यात्मिक आघाडीत संघर्ष सुरू झालाय का, याची चर्चा रंगली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Devendra Fadnavis : 'देवाचा न्याया'वर भाजप-शिंदेंगटात अध्यात्मिक संघर्ष, देवाचं' राज्य नसताना 'एकनाथां'नी...''
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement