TRENDING:

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा  23 वर्षानंतर नोकरीचा राजीनामा, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Last Updated:

Amruta Fadnavis Resign : 23 वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिग क्षेत्रात तब्बल 23  वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर आपल्या नोकरीचा राजीनामा झाला आहे. अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ते वरिष्ठ उपाध्यक्ष असा त्यांचा अॅक्सिस बँकेतील प्रवास होता.
amruta fadanvis resign
amruta fadanvis resign
advertisement

अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत आपल्या 23 वर्षांच्या प्रवासाचे सिंहावलोकन करत आपल्या संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 23 वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. मेहनत, सातत्य आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडत वरिष्ठ उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शाखा संचालन, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी, ग्राहक संबंध आदी महत्त्वाच्या विभागांत त्यांनी प्रभावी नेतृत्व केले.

advertisement

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अ‍ॅक्सिस बँक ही संस्था माझ्यासाठी केवळ कामाचे ठिकाण नव्हते, तर ती माझे कुटुंब, गुरु आणि दुसरे घर राहिली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दीर्घ प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठांचे त्यांनी मनापासून आभार मानले. विशेषतः बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे त्यांनी आभार मानले. अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, बँकेतील प्रत्येक टप्प्यावर त्यांना शिकण्याची संधी मिळाली आणि व्यावसायिक तसेच वैयक्तिकदृष्ट्या समृद्ध होण्यास या संस्थेने मोठे योगदान दिले.

advertisement

सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय

अमृता फडणवीस या केवळ बँकिंग क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गायन क्षेत्रातही सक्रिय आहेत. पुढील काळात त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   विविध  राजकीय मुद्द्यांवर अमृता फडणवीस आपली रोखठोक मते व्यक्त करत असतात, त्या वक्तव्यांची अनेकदा चर्चा देखील होत असते.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘उद्यानाचा निधी खर्च होत नाही’, शिवप्रेंमींवर आली भीक मागण्याची वेळ, काय घडलं?
सर्व पहा

Amruta Fadnavis: धन्यवाद महाराष्ट्र! मी मिसेस मुख्यमंत्री नाही तर तुमची वहिनी...शपथविधीनंतर अमृता फडणवीसांचं खास ट्वीट 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा  23 वर्षानंतर नोकरीचा राजीनामा, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल