बहिष्काराचे नेमके कारण काय?
२८ जानेवारी रोजी ज्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला आणि ज्यात अजित पवार यांचे निधन झाले, ते विमान 'व्हीएसआर' कंपनीचे 'लेअर जेट' (Learjet) प्रकारचे होते. या भीषण अपघातानंतर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये भीतीचे आणि संशयाचे वातावरण होते. नेत्यांनी आणि आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कंपनीच्या विमानांतून प्रवास करण्यास नकार दिला आणि तशी विनंती उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली होती. सहकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शिंदे यांनी हा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
केंद्र सरकार आणि DGCA कडूनही कठोर कारवाई
या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) देखील कडक पावले उचलली आहेत. 'व्हीएसआर' कंपनीच्या ताफ्यातील सर्व 'लेअर जेट' विमानांच्या उड्डाणांवर केंद्र सरकारने तात्पुरती बंदी घातली आहे. जोपर्यंत या अपघाताचा सखोल तांत्रिक तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही विमाने हवेत झेपावू शकणार नाहीत.
रोहित पवारांच्या आरोपांनी संशय बळावला
अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात आहे की यामागे काही 'घातपात' आहे, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. रोहित पवारांनी विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि देखभालीवर (Maintenance) प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय आणि कायदेशीर वळण मिळाले आहे.
