जवळपास २४ तास नॉट रिचेबल राहिल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. आपण तुळजापूरला देवदर्शनासाठी गेलो होतो, असं कारण त्यांनी दिलं. तसेच आपण ठाकरे गटासोबत असल्याची भूमिका देखील त्यांनी जाहीर केली. पण या सगळ्या घडामोडी सुरु असताना सरिता म्हस्के यांचं अपहरण करण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली. यावर स्वत: म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत आपली भूमिका मांडली आहे.
advertisement
"माझं अपहरण झाल्याची चुकीची बातमी पसरवली जात आहे, मी पक्षाशी एकनिष्ठ आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. सरिता म्हस्के यांनी एक व्हिडीओ जारी करत सांगितलं की, त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या गेल्या. माझं अपहरण झालं आहे, अशी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. पण त्यात तथ्य नाही. मी जे स्टेटमेंट दिलं आहे, तेच खरं आहे. मी माझ्या पक्षाच्या सतत संपर्कात होते आणि उद्धव ठाकरे साहेबांना सोडून मी कुठेही जाणार नाही.
विरोधकांकडून आपली नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. म्हस्के म्हणाल्या, "जर मला गद्दारी करायची असती, तर मी त्याच दिवशी समोर आले नसते. उगीच एखाद्या लोकप्रतिनिधीची बदनामी करणे चुकीचे आहे. कोकण भवनमध्ये जाण्यासाठी अद्याप एक महिन्याचा अवधी आहे आणि महापौर निवडीसाठी ३० तारखेपर्यंत वेळ आहे. जर समोरच्यांकडे बहुमत आहे, तर मग मला एकटीला सोबत घेऊन काय फरक पडणार आहे? माझ्या संकट काळात ठाकरेंनी मला तिकीट देऊन विश्वास दाखवला आहे. पक्षाचा माझ्यावर पूर्ण भरोसा आहे आणि मी देखील पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे, असंही म्हस्के म्हणाल्या.
