TRENDING:

मोठी घडामोड! मुंबईत आरक्षणाची लॉटरी फुटली, ठाण्यात भाजपने बॉम्ब टाकला, थेट महापौर पदासाठी नावं केलं घोषित

Last Updated:

Thane News : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण आज अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून, त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या ठाणे महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण आज अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून, त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या ठाणे महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.
thane mahapalika
thane mahapalika
advertisement

ठाण्याच्या राजकारणात नवे समीकरण

ठाणे महानगरपालिका ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानली जाते. त्यामुळे येथील महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने आता या प्रवर्गातील नगरसेवकांपैकी कोणाला महापौरपदाची संधी मिळणार? याबाबत चर्चा सुरू झाली.

भाजपकडून महापौरपदासाठी नाव निश्चित

advertisement

आरक्षण सोडत जाहीर होताच भाजपने वेगाने हालचाली करत महापौरपदासाठी आपल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेले नगरसेवक सुरेश कांबळे यांचे नाव भाजपकडून महापौरपदासाठी सुचवण्यात आले आहे.

महापौरपदासाठी औपचारिक प्रक्रिया लवकरच

महापौरपदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता पुढील टप्प्यात गटनेत्याची निवड, अधिकृत गटनोंदणी आणि त्यानंतर महापौर निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे.

advertisement

कल्याण-डोंबिवलीत काय होणार?

कल्याण–डोंबिवली महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे आरक्षण सोडतीत स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे महापौरपदावर भाजपचा दावा आपोआपच संपुष्टात आला आहे. कारण भाजपकडे सध्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नसल्याने, आगामी काळात कल्याण–डोंबिवली महापालिकेला ST प्रवर्गातीलच महापौर मिळणार हे निश्चित झाले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंती! बाप्पाची पूजा कशी करावी? काय आहेत नियम? Video
सर्व पहा

दरम्यान, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकूण तीन नगरसेवक असून, त्यांच्यातूनच महापौरपदासाठी निवड होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे ST प्रवर्गातील दोन नगरसेवक किरण भांगले आणि हर्षाली थविल हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्याचबरोबर, मनसेच्या ST प्रवर्गातील नगरसेविका शीतल मंढारी यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे आता या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी घडामोड! मुंबईत आरक्षणाची लॉटरी फुटली, ठाण्यात भाजपने बॉम्ब टाकला, थेट महापौर पदासाठी नावं केलं घोषित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल