पूजा गायकवाड नावाची नर्तिका दिसायला जितकी भोळी दिसते त्यापेक्षा तिचं काम हे भयानक आहे. पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्याती बार्शी येथील वैराग इथं एका कला केंद्रात काम करते. याच कला केंद्रामध्ये बीडचे येथील गेवराईचे माजी सरपंच गोविंद बर्गे (वय ३४) यांची भेट झाली. गोविंद बर्गे ही तिच्या प्रेमात पडले आणि आपली दौलत तिच्यावर उधळली. पण जेव्हा तिने घराची मागणी केली तेव्हा तिने ब्लॅकमेल केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांना केला. पण आता पूजा गायकवाडचं एक इंस्टाग्राम अकाऊंट समोर आलं आहे. यामध्ये तिचे काही व्हिडीओ नेहमीसारखे नाचताना दिसून येत आहे.
advertisement
गळ्यात मंगळसूत्र आणि S नावाची पोस्ट
गमंत म्हणजे, या व्हिडीओमध्ये तिने मंगळसूत्र घातलं आहे. वेगवेगळ्या गाण्यावर तिचे हे व्हिडीओ आहे. तिने इंन्साटाग्रामवर अनेक पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने S नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. बस तुम्हारे हो गये, S अशा नावाने या पोस्ट आहे. त्यामुळे S नावाची व्यक्ती कोण आहे, हे मात्र समोर येऊ शकलं नाही. पण हे तिचं जुनं इंन्स्टाग्राम अकाऊंट असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली, तेव्हा तिचं दुसरं इंन्साटाग्राम अकाऊंट असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
पूजा गायकवाड नेमकी आली कुठून?
पूजा गायकवाड मुळात एक नर्तिका आहे. ती आधी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुप्रसिद्ध असलेल्या कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती, अशी माहिती समोर आली आहे. कुलस्वामिनी कला केंद्र हे सुरुवातील बेकायदेशीररित्या उभारलेलं होतं. त्यामुळे या भागातील १५ ते २० गावातील लोकांनी वेळोवेळी आंदोलनं करून हे कला केंद्र बंद करावे अशी मागणी केली होती. या कला केंद्रामध्ये दिवस रात्र नाचगाण्याच्या पार्ट्या होत होत्या. एवढंच नाहीतर सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं इथं आयोजन होत होतं. या कला केंद्रामध्ये नेहमी गर्दी राहत होती. कित्येक वेळा इथं मारामारीच्या घटनाही घडल्या. धक्कादायक म्हणजे, इथं आलेल्या ग्राहकांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळले गेल्याचे प्रकारही घडले आहे. पूजा गायकवाड याच कुलस्वामिनी कला केंद्रात नर्तिका होती. तिची सुरुवात याच कुलस्वामिनी कला केंद्रात झाल्याची माहिती समोर आली आहे. कुलस्वामिनी केंद्रात सर्रासपणे ब्लॅकमेलिंग केलं जायचं. याचं बाळकडू पूजाला इथं मिळालं.
पूजाने पोलिसांना दिली गोविंदबद्दल संबंधाची कबुली
गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. पण, आता तिने गोविंद बर्गे यांच्यासोबत एक धक्कादायक कबुली दिली आहे. गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाड हिनी पोलिसांना कबुली दिली आहे.
गोविंदच्या आत्महत्येवेळी पूजा कुठे होती?
गोविंद बर्गे यांनी पूजाला भेटण्यासाठी तिच्या गावी पोहोचला होता. तिथे नसल्यामुळे कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं समोर आहे. त्यावेळी पारगाव येथील कला केंद्रात पूजा गायकवाड ही रात्रभर असल्याची पोलिसांची माहिती दिली आहे. पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैरागजवळ आला होता. तिथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते. आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून तपासाची दिशा ठरणार आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे पोलीस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे.