दत्ता भरणे झी 24 तासशी बोलत होते. यावेळी हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर दत्ता भरणे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शेवटी राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचं त्यांना अभिनंदन करावस वाटलं असेल, यासाठी कदाचित ते गेले असतील.त्यामुळे निवडणुकीपुरतच राजकारण करायचं असतं त्यानंतर ते बाजूला सोडायंच असतं. तसेच वैयक्तिक संबंध हे जपायचे असतात, म्हणून त्यांनी ही भेट घेतली असेल, असे दत्ता भरणे यांनी म्हटलं आहे. तसेच शांत झोप लागत नसेल तर महायुतीत स्वागत आहे,अशा शब्दात दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला हाणला आहे.
advertisement
शेवटी विजय पण पचवता आले पाहिजे, पराभव पण पचवता आला पाहिजे.इंदापूरची जनता आमची सुज्ञ आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या जीवावर माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून आला आहे, असे दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान इंदापूर विधानसभा मतदार संघात दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीत दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा दारूण पराभव केला होता. दत्ता भरणे हे 20 हजार मतांनी विजयी ठरले होते.
