यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट, २०२५ ला होत आहे. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात येणारा ऑगस्ट २०२५ महिन्याचे वेतन, निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
advertisement
सरकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाआधी भेट
परंतु शासन निर्णयातील तरतूद शिथील करुन, दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणाऱ्या ऑगस्ट, २०२५ या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्तीवेतनाचे / कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्रदान २६ ऑगस्ट, २०२५ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. यासाठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत असल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले.
सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे, कृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, तसेच निवृत वेतन धारक, कुटुंब निवृत वेतन धारक यांना देखील लागू होतील.
एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला होणार
एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील २६ ऑगस्टला म्हणजेच गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला होणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.