TRENDING:

सायबर फसवणूक झालेल्या गुन्ह्याचा छडा, अनेक लोकांचे पैसे परत, मुख्यमंत्र्यांनी १० कोटी वाटले

Last Updated:

नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे ‘गरुड दृष्टी’ सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल १० कोटी रुपये रकमेच्या वितरण झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी ‘गरुड दृष्टी’ हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले
advertisement

नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे ‘गरुड दृष्टी’ सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल १० कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशी, राजेंद्र दाभाडे, शिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

advertisement

स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणे, धमक्या देणे, हेट स्पीच, फेक न्यूज, अंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात. त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

advertisement

फसवणूक झालेल्या लोकांना तपासानंतर परत मिळाले पैसे

रोहित अग्रवाल 73 लाख रुपये, शशिकांत नारायण परांडे 34 लाख 77 हजार 724, देविदास पारखी 35 लाख 15 हजार 842, विजय प्रकाश पाठक 19 लाख 90 हजार 354, विजय मेनघाणी 19 लाख रुपये, देवेंद्र खराटे 12 लाख 81 हजार, श्रीमती राजमनी अजय जोशी 29 लाख 95 हजार, राहुल चावडा 15 लाख, बुद्धपाल बागडे 10 लाख, आदित्य गोयंका 26 लाख 20 हजार 556, संगीता आष्टणकर 8 लाख 24 हजार रुपये या प्रमाणे रक्कम परत करण्यात आली. ही प्रातिनिधिक नावे आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी ‘गरुड दृष्टी’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणे व त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल. भविष्यात या टूल्सचा विस्तार आणि क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज ज्या लोकांना त्यांचे पैसे मिळाले त्या व्यक्तींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सायबर फसवणूक झालेल्या गुन्ह्याचा छडा, अनेक लोकांचे पैसे परत, मुख्यमंत्र्यांनी १० कोटी वाटले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल