'मी त्यांना दोष देणार नाही, मागच्यावेळीही उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते, नंतर त्यांनी माफीही मागितली आणि सांगितली उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा त्रास झाला होता, त्यामुळे मी रागारागात बोललो. आपण असं समजूया त्यांना उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते यासंदर्भात बोलले', असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं आहे.
advertisement
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात निघालेल्या अटक वॉरंटवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मनोज जरांगेंची केस 2013 ची आहे. याआधीही त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला. कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत, तर त्याठिकाणी नॉन बेलेबल वॉरंट निघतो. तो नॉन बेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिल्यानंतर रद्द होतो. तशाचप्रकारे मागच्या काळातही त्यांचा वॉरंट निघाला, तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला. आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत, त्यामुळे त्यांचा अटक वॉरंट निघाला. त्याच्याशी आमचा कुणाचाही संबंध नाहीये. ते जर तारखेवर गेले तर जज त्यांचा वॉरंट कॅन्सल करतील. आमच्याबद्दलही असे वॉरंट यापूर्वी निघाले. आमच्यावरही अनेक आंदोलनाच्या केस आहेत. त्या केसमध्ये जेव्हा आम्ही गेलो नाही तेव्हा आमच्यावरही वॉरंट निघाले. आम्ही हजर झालो तर वॉरंट रद्द झाले', असं फडणवीस म्हणाले.
मुंडे-महाजन घराण्याचं नाव घेऊन मनोज जरांगेंचं फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले...
'देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल? देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे कुणाला फायदा आहे? टार्गेट फक्त एकच देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसची ही जी काही शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे, हे कुणाला समजतं, हे कुणाला घातक वाटतं? देवेंद्र फडणवीसमुळे कुणाला धोका आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इकोसिस्टिम कोण चालवतंय, हे सगळ्यांना माहिती आहे', अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
