Manoj Jarange: मुंडे-महाजन घराण्याचं नाव घेऊन मनोज जरांगेंचं फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले...
- Published by:sachin Salve
Last Updated:
'मी मॅनेज होत नाही म्हणून मला आत टाकत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे घराण्याला वनवास करायला लावला'
अंतरवाली: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आणि भाजपमध्ये आता दिवसेंदिवस संघर्ष चिघळत चालला आहे. भाजप नेत्यांवर मनोज जरांगे उघडपणे आरोप करत आहे. आज उपोषण सोडण्याआधी पुन्हा एकदा जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'फडणवीस यांनी मुंडे घराण्याला वनवास करायला लावला. फडणवीसांनी मुंडे साहेबांचं, महाजन साहेबांचं घराणं संपवलं' असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. आज पाचव्या दिवशी उपोषण सोडलं. पण उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी भाजप नेत्यांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'मला नाही राजकारणात जायचं नाही. जेवढे विधानपरिषदेवर गेलेले आहेत ते फक्त मला बोलायला ठेवले. मात्र हे भाजप संपायला बसले आहेत. मी मॅनेज होत नाही म्हणून मला आत टाकत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे घराण्याला वनवास करायला लावला. फडणवीसांनी मुंडे साहेबांचं, महाजन साहेबांचं घराणं संपवलं. देवेंद्र अप्पा मी भित असतो का? तुम्हाला मराठी कळत नाही का? बिगर मिशीवाले लावतील मागे. सगळ्या विधान परिषदेला नापास उताडा आहे, मी जर जेलमध्ये गेलो तर भाजपचं एकही सीट येवू देवू नका, असं आवाहनही जरांगेंनी केलं.
advertisement
नितीन गडकरींचं केलं कौतुक
'नितीन गडकरींसारखा माणूसच नाही. ज्या खात्यात जाईल तिथून पाणीच काढीन. सगळ्या जाती एकत्र झाल्या तरी मराठा यांचे 40-50 आमदार पाडू शकतो. ज्याला जनमत नाही त्याला फडणवीस मागच्या दारातून पाठवतो, अशी टीकाही जरांगेंनी केली.
'मला जेलमध्ये मारून टाकायचं यांना'
view comments'आमच्याकडं यायला मंत्रीच राहिला नाही. शंभुराजे महानाट्य दाखवलं होतं त्यात तोटा आला तर दगड घालतो का आता. मी पैसे दिले तरी आमच्या गळ्यात गुंतवलं. 13 वर्ष झालं काहीच नव्हतं आता एकाएकी वॉरंटच आलं. नोटीस न देता मला वॉरंट जारी करण्यात आलं. मी आमदारकीला वाळुन फेकून देतो. हे मला मॅनेज करायचं बघत आहेत. मला जेलमध्ये आत मारून टाकायचं आहे. भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे, तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत. फडणवीसांना काय करायचं तर करु द्या मी भीत नाही. बघु कसा नेतो जेलमध्ये तर बघू
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 24, 2024 2:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange: मुंडे-महाजन घराण्याचं नाव घेऊन मनोज जरांगेंचं फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले...


