advertisement

Mumbai: एक वार अन् खेळ खल्लास, ओंकारने प्राध्यापकाची हत्या कशी केली? नवा CCTV VIDEO समोर

Last Updated:

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी घडलेल्या प्राध्यापक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं आहे. या घटनेचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात आरोपी ओंकार हा अलोक यांच्यावर वार करताना दिसत आहे.

News18
News18
मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी घडलेल्या प्राध्यापक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपी ओंकार एकनाथ शिंदे (२७) याला बेड्या ठोकल्या आहेत. हल्लेखोर ओंकारच्या अटकेनंतर या प्रकरणातील विविध सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येत आहेत. आज सकाळी ओंकरचा हत्या करून पळून जातानाचा व्हिडीओ समोर आला होता.
आता या घटनेचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ओंकार शिंदे हा प्राध्यापक अलोक सिंह यांच्यावर वार करताना दिसत आहे. धावत्या लोकलमध्ये वाद झाल्यानंतर ओंकारने मालाड रेल्वे स्थानक परिसरात ट्रेन येताच आपल्याजवळी टोकदार हत्याराने अलोक सिंह यांच्यावर एकच वार केला. हा वार इतका भयंकर होता की अलोक यांच्या पोटातून रक्ताची धार सुटली. हल्ला झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरत कसा बसा प्लॅटफॉर्म गाठला. ते तेथील बाकड्यावर जाऊन बसले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अलोक यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

नेमकी घटना काय?

मालाड येथील रहिवासी असलेले आलोक सिंह (३१) हे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवारी संध्याकाळी ते बोरिवली लोकलमधून प्रवास करत होते. मालाड स्थानकात उतरताना आरोपी ओंकार शिंदे आणि त्यांच्यात किरकोळ धक्का लागल्यावरून वादावादी सुरू झाली. ओंकार हा आलोक यांना पुढे सरकण्यासाठी सारखा ढकलत होता. पुढे एक महिला प्रवासी उभी असल्याने आलोक सिंह यांनी "धक्का मारू नको" असे म्हणत विरोध केला. मात्र, रागाच्या भरात असलेल्या ओंकारने खिशातून एक वस्तू काढली आणि थेट आलोक सिंह यांच्या पोटात खुपसली.
advertisement

चाकू नाही, तर चिमट्याने केली हत्या

सुरुवातीला ही हत्या चाकूने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, बोरिवली रेल्वे पोलीस मुख्यालयात आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने वेगळीच माहिती दिली. ओंकार शिंदे हा दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरातील एका मेटल कारखान्यात काम करतो. त्याच्याकडे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी टोकदार चिमटा होता. भांडण विकोपाला गेल्यावर त्याने याच चिमट्याने आलोक यांच्यावर वार केला. चिमटा अत्यंत टोकदार असल्याने तो पोटात खोलवर घुसला आणि पोटातून भळाभळा रक्त येऊ लागलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने आलोक सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

मालाडमधील शिक्षकाची हत्या कशी झाली? CCTV VIDEO

सीसीटीव्ही आणि १२ तासांचे थरारनाट्य

advertisement
हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपीने फक्त एकच वार केला आणि तो गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. रेल्वे पोलिसांनी तातडीने पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला. अखेर १२ तासांच्या आत मालाड स्थानक परिसरातूनच त्याला ताब्यात घेण्यात आले. ओंकारने गुन्ह्यात वापरलेला चिमटा फेकून दिला असून, पोलीस सध्या तो शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: एक वार अन् खेळ खल्लास, ओंकारने प्राध्यापकाची हत्या कशी केली? नवा CCTV VIDEO समोर
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement