TRENDING:

Devendra Fadnavis : दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोहिते पाटलांना इशारा

Last Updated:

शरद पवार साहेबांचं मला नवल वाटलं. पवारांनी कधीही ईव्हीएमबद्दल टिप्पणी केली नाही पण यावेळी तेही बोललेत. छोटी राज्य आम्हाला आणि मोठी राज्ये भाजपला असं पवार म्हणाले. आता तर ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की ईव्हीएमवर बोलू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Devendra Fadnavis On Markadwadi : राम सातपुते सारखा सर्वसाधारण कार्यकर्ता पाच वर्ष राबतो आणि एकट्या मारकडवाडीसाठी 22 कोटी रूपयाची काम करतो. त्याला जास्त मतदान मिळाल्यानंतर लोकांना जाऊन धमकावता तुम्ही. एखाद्या गावामध्ये मतं मिळाली नाही म्हणुन गावामध्ये जाऊन दादागिरी करायची. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहित पाटलांना दिला आहे.
devendra fadnavis
devendra fadnavis
advertisement

खरं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मारकडवाडीत बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाला. पण प्रशासनाच्या दबावानंतर ते शक्य होऊ शकलं नाही. या प्रकरणी अनेक गावकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर मारकडवाडीची राज्यभरात चर्चा रंगली होती. याच मारकडवाडीच्या घटनेवर आता देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत बोलले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम सातपुते सारखा सर्वसाधारण कार्यकर्ता पाच वर्ष राबतो आणि एकट्या मारकडवाडीसाठी 22 कोटी रूपयाची काम करतो. त्याला जास्त मतदान मिळाल्यानंतर लोकांना जाऊन धमकावता तुम्ही. या धमकीचे ऑडिओ रेकॉर्डींग आहेत. आपल्याला बॅलेटच व्होटींग घ्यायचं आहे. या वोटींगमध्ये मतं हे राष्ट्रवादी काँग्रस शरद पवार पक्षाला, ही कुठली पद्धत आहे? ही कुठली लोकशाही आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी करत एखाद्या गावामध्ये मतं मिळाली नाही म्हणुन गावामध्ये जाऊन दादागिरी करायची. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहित पाटलांना दिलाय.

advertisement

शरद पवार साहेबांचं मला नवल वाटलं. पवारांनी कधीही ईव्हीएमबद्दल टिप्पणी केली नाही पण यावेळी तेही बोललेत. छोटी राज्य आम्हाला आणि मोठी राज्ये भाजपला असं पवार म्हणाले. आता तर ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की ईव्हीएमवर बोलू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

तसेच ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र आहे. निकाल बाजूने लागला तर जनतेचा कौल विरोधात गेला की लोकशाहीचा खून, असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला. तसेच तुम्ही ईव्हीएमवर बोलून संविधानावर अविश्वास दाखवताय.विरोधक यातून एकप्रकारे राजद्रोह करतायत, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोहिते पाटलांना इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल