बदल्याच्या राजकारणावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी बदल्याच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे.त्यांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला आहे. मी स्वप्ल काय अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो.आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले,अशी टीका त्यांनी ठाकरे-पवारांवर केली. त्याचसोबत महायुतीवर, भाजपवर आणि माझ्यावर जनतेने मोठा विश्वास विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर सडेतोड उत्तर दिले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
advertisement
तसेच नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर आर्थिक शिस्तीसाठी अनेक योजनांना कात्री बसणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात आर्थिक शिस्तीची नक्कीच गरज आहे. त्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना आणि अल्पकालीन उपाययोजना अशा दोन्ही पातळ्यांवर काम करावे लागेल, असे फडणवीसांनी सांगितले.
आर्थिक शिस्त म्हणजे लोकाभिमूख योजनांना कात्री लावणे, असा अर्थ होत नाही. त्या सुरु ठेवण्याबरोबरच राज्याचे उत्पन्न वाढणे,औद्योगिक गुंतवणुकीसह विविध क्षेत्रात राज्य अव्वल स्थानी ठेवणे हे महत्वाचे आहे.खर्च, उत्पन्नाचे अचूक भान ठेवत आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
