रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनंत अंबानी आणि त्यांच्या पत्नी राधिका या सोहळ्याला उपस्थित आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी या शपथविधी सोहळ्यात अंबानी कुटुंबाचं स्वागत केलं.
अंबानी कुटुंबासह सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली याचसोबत शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दिक्षीत, रणवीर सिंग या बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू उपस्थित आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2024 5:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटुंबाची हजेरी