माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद जाणार असल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे दिल्लीत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. धनंजय मुंडेंचा हा दौरा पूर्वनियोजीत असल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे कोकांटेंचं अटर वॉरंटचा मुहूर्त साधत धनंजय मुंडेंनी दिल्ली गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार मुंबईत तरी धनंजय मुंडेंनी दिल्ली का गाठली?
advertisement
धनंजय मुंडे यांनी संसदेत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी करत चर्चा केल्याची माहिती आहे. एनडीएमधील बहुंताश वरिष्ठ नेते दिल्लीत असल्याने मंत्रीपदासाठी धनुभाऊ चर्चा करत आहेत का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रफुल्ल पटेल यांची देखील धनंजय मुंडेची भेट घेणार आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहे. त्यामुळे कमबॅकचा निर्णय घ्यायचा असेल तर प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यात चर्चा होऊनच अंतीम होईल त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजधानी दिल्ली गाठल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आले. त्यानंतर मुंडे यांनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला होता. राजीनाम्याच्या सहा महिन्यानंतर आपल्याला रिकामे ठेवू नका, हाताला काम द्या, जबादारी द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे जाहीर कार्यक्रमात केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यानंतरही पक्षाकडून तशा प्रकारच्या सकारात्म हालाचली झालेल्या नाहीत. यामुळे धनंजय मुंडे आता स्वत:च प्रयत्न करताना दिसत आहेत.
कमबॅकचा निर्णय दिल्ली दरबारी
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्ली दरबारी झाला होता. त्यामुळे आता कमबॅकचा निर्णय देखील निर्णय दिल्ली दरबारी होण्याची शक्यता आहे.
