खरं तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीनंतर दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल होणार आहे. या भेटीत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवायचे की नाही? याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी वाल्मिक कराडचं नाव घेतं धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. याच कारणामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांना अधिवेशनात टार्गेट केलं होतं. त्यात आता गुरूवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस धनंजय मुंडे अधिवेशनात गैरहजर होते. त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.त्यात आता अजित पवार, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
