TRENDING:

Santosh Deshmukh Case : 'वाल्मिक कराड माझा कार्यकर्ता...', संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे काय म्हणाले?

Last Updated:

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. आणि तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचाही आरोप विरोधकांनी केला होता. यावर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहाबाहेर प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dhananjay Munde On Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चांगलाच पेटला आहे. मंगळवारी हिवाळी अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. आणि तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचाही आरोप विरोधकांनी केला होता. यावर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहाबाहेर प्रतिक्रिया दिली आहे.
dhananjay munde
dhananjay munde
advertisement

धनंजय मुंडे सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, संतोष देशमुख प्रकरणात कारवाई पहिल्या दिवशीच झाली होती. आणि पहिल्याच दिवशी 4 आरोपींना अटक करण्यात आली होती आणि बाकीच्या इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी 8 वेगवेगळ्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल,असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

advertisement

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, माझं असं म्हणण आहे, मी या प्रकरणावर जास्तीचे बोलण्यापेक्षा मी मुख्यमंत्री स्वत: गृहमंत्री आहेत ते या प्रकरणात स्वत:निवेदन करतो म्हटल्यावर सभागृहाच्या बाहेर बोलणे म्हणजे सभागृहाचा अपमान करण्यासारखं आहे. तसेच माझ्या आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करणारी असंख्य कार्यकर्ते आहेत.त्यातला एक वाल्मिक कराड आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला आहे? कशामुळे झाला आहे? त्याचा तपास पोलीस करतील,असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

advertisement

गुन्हेगाराला दोन दोन बॉडीगार्ड कसे मिळतात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

दरम्यान या प्रकरणावरून आमदार संदिप क्षीरसागर आक्रमक झाले होते. आमच्या बीड जिल्ह्यात भयानक गोष्ट घडली आहे. सरपंच संतोष देशमुखचा दिवसाढवळ्या खुन करण्यात आला आहे. पण अजून त्याच्या मागचा मास्टरमाईंड सापडलेला आहे. याबाबत मी वारंवार तक्रार करतोय, त्याचं नाव वाल्मिक कराड आहे.आमदार म्हणून आपल्याला एक बॉडिगार्ड मिळतो आणि या क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कसे मिळतात.या आरोपीला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आत टाकलंय. पण 302 मध्ये जो कट रचलेला होता त्याच्यामध्ये हा वाल्मिक करा़डचा नाव नाही आहे. हत्या केलेल्या आरोपीचे कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडे कॉल रेकॉर्ड जर सापडले तर या खुनाचा उलगडा होईल, असे आमदार संदिप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case : 'वाल्मिक कराड माझा कार्यकर्ता...', संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे काय म्हणाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल