TRENDING:

परळीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांना जेलमधल्या वाल्मिक कराडची आठवण, म्हणाले...

Last Updated:

Dhananjay Munde on Walmik Karad: परळी नगरपालिकेच्या प्रचारावेळी वाल्मिक कराडची आठवण काढून धनंजय मुंडे यांनी अण्णा समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परळी (बीड) : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याची आठवण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांना झाली. माझा सहकारी आज आपल्यात नाही याची जाणीव असल्याचे ते आपल्या भाषणात म्हणाले. तसेच न्यायालय काय खरे काय खोटे हे तपासून पाहील, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे
advertisement

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता. धनंजय मुंडे यांची बीडमधील सगळी कामे वाल्मिक कराड हाच पाहायचा. आर्थिक नियोजनापासून अगदी निवडणूक प्रचार यंत्रणेची जबाबदारी देखील वाल्मिक कराड याच्यावरच होती. त्याच वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचे आरोप झाल्यानंतर  त्याला जेलमध्ये जावे लागले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही गेले. अनेकदा मंत्रिपद गेल्याची खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. आज तर परळी नगरपालिकेच्या प्रचारावेळी वाल्मिक कराडची आठवण काढून अण्णा समर्थकांना त्यांनी चुचकारण्याचा प्रयत्न केला.

advertisement

धनंजय मुंडे यांना जेलमधल्या वाल्मिक कराडची आठवण

मला माझ्या सहकाऱ्याची आज आठवण येतेय. परळीतले जगमित्र कार्यालय १२ महिने २४ तास सुरू होते आणि आहे. पण तिथे एक व्यक्ती नाहीये. त्या कार्यालयातून अडल्या नडलेल्यांना गोरगरिबांना आपण मदत करायचो. पण या सगळ्यात एक सहकारी आपल्यात नाहीये, याची मला जाणीव आहे. कुणाचे काय चुकले, काय नाही हे न्यायदेवता तपासून पाहील, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळीच्या प्रचारसभेत वाल्मिक कराड याची आठवण काढून शहरात हजारोंच्या संख्येने असलेल्या वाल्मिक अण्णा समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याची चर्चा आहे.

advertisement

निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांचं भावनिक कार्ड

वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सहकाऱ्यासाठी खुलेपणाने बाजू मांडली नाही, असे प्रत्यपक्षणे सांगत कराड कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. तसेच राजकीय क्षेत्रात दमदार कामगिरी करीत असताना राजकीय कटाच्या उद्देशातून त्यांना अडकविण्यात आल्याचा गंभीर आरोप कराड कुटुंबियांनी केला. यामुळेच धनंजय मुंडे यांनी वाल्मिकची आठवण करून नगर परिषद निवडणुकीवेळी भावनिक खेळी खेळल्याचे देखील बोलले जाते.

advertisement

धनंजय मुंडे यांच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडे यांची खंत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी
सर्व पहा

दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. एखाद्या कारणामुळे एखाद्यावर आरोप होतात. परंतु आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेले लोक देखील भरडले जातात. गव्हाबरोबर किडेही रगडले जातात, असे म्हणत एकप्रकारे धनंजय मुंडे यांनी कड घेण्याचा पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परळीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांना जेलमधल्या वाल्मिक कराडची आठवण, म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल