धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीला ओळखले जाते. याठिकाणी संपूर्ण जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीत तुळजापूर येथे मोठा उत्सव असतो. त्यामुळे या काळात भाविकांची मोठी गर्दी याठिकाणी असते. आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. तुळजापूर येथेही तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झाली आहे. आज 3 ऑक्टोबर पासून ते 18 ऑक्टोबर दरम्यान हा शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहे. तुळजाभवानी मातेची "ललिता पंचमी" रथ अलंकार महापूजा, मुरली अलंकार महापुजा, शेषशाही अलंकार महापुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा यासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तर धार्मिक कार्यक्रमांनी शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार असून 18 ऑक्टोबरला नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
यळकोट यळकोट, जय मल्हार!, जेजुरी गडावर जयघोषात विधिवत घटस्थापना, VIDEO
दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार 56 कोटींच्या विकास कामांना प्रारंभ -
श्री तुळजाभवानी मंदिरात मंदिर संस्थानच्या स्वनिधीतून सुमारे 56 कोटी रुपयांची कामे हाती घेतली जात आहेत. पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन संवर्धन तसेच भाविकांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने ही कामे होणार आहेत. कामे सुरू असताना भाविकांची काही काळ गैरसोय होणार असली तरी दीर्घकालीन सुविधांचा विचार करून सहकार्य करावे. दसऱ्याच्या मुहूर्तावर विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.