यळकोट यळकोट, जय मल्हार!, जेजुरी गडावर जयघोषात विधिवत घटस्थापना, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
navratrotsav pune - महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची सकाळी 11:30 वाजता परंपरेनुसार विधिवत घटस्थापना करण्यात आली आणि नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे - आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असल्याने सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची सकाळी 11:30 वाजता परंपरेनुसार विधिवत घटस्थापना करण्यात आली आणि नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. याचबाबत लोकल18 च्या टीमने वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले, जाणून घेऊयात.
विधिवत घटस्थापना -
आज स्थानिकांच्या हस्ते सकाळी श्रींची पूजा करण्यात आली. मंदिरात पाकाळणी विधी करण्यात येऊन उत्सव मूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात आले. त्यानंतर घडशी समाज बांधवांच्या सनई-चौघड्याच्या मंगलमय निनादात खंडोबा-म्हाळसादेवींच्या उत्सवमूर्ती पुजारी, सेवेकरी यांनी रंगमहाल (बालद्वारी) येथे आणण्यात आले. त्यानंतर वेदमूर्तींच्या वेदमंत्र पठणात विधिवत घटस्थापना करण्यात आली.
advertisement
आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खंडेरायाचा मुख्य गाभारा पाना-फुलांनी सजविण्यात आला आहे. तसेच गडकोट आवाराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामस्थांना व येणाऱ्या भाविकांना नवरात्र उत्सव काळात उंबऱ्यातून दर्शनाचा लाभ मिळणार आहे. श्री खंडोबा मंदिरामध्ये उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी केले जात आहेत. प्रतिदिन वाघ्या मुरळी, गोंधळी स्थानिक कलावंत गडावर गाणी म्हणून उपस्थित असतात. या निमित्ताने मराठी संस्कृतीचे दर्शन देखील होते, अशी माहिती वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांनी दिली.
advertisement
जेजुरीचा दसरा उत्सव राज्यात प्रसिद्ध -
सदानंदाचा, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरी गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली. आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. जेजुरीचा दसरा उत्सव, खंडा उचलणे स्पर्धा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. अनेक जण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक देखील असतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 03, 2024 4:19 PM IST