TRENDING:

Dharashiv News : पेरला गहू, हरभरा अन् उगवलं सोयाबीन; धाराशिवमधील शेतकरी हैराण

Last Updated:

 पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आपण अनेकदा पाहिल्या आहेत, मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यंदा नवीन समस्येनं त्रस्त झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव, 4 डिसेंबर, बालाजी निरफळ :  पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आपण अनेकदा पाहिल्या आहेत, मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यंदा नवीन तक्रारीने त्रस्त झाले आहे. खरीपाच्या वेळी पेरलेले सोयाबीन रब्बीत उगवत आहे. या नव्या समस्येमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
News18
News18
advertisement

खरीप पेरणीच्या वेळी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेर केली होती, मात्र खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवल्या नसल्याच्या तक्रारी देखील केल्या. मात्र रब्बी पेरणीला धाराशिव जिल्ह्यात थोडा बहुत पाऊस झाला, त्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी हरभरा गहू या पिकाची पेर सुरू केली. मात्र गहू, हरभारा पेरला आणि त्याच्यासोबत खरीपातील सोयाबीनही रब्बी हंगामात उगवलं. या प्रकारमुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. ठाराविक ठिकाणीच नाही तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा प्रकार घडला आहे.

advertisement

खरिपाच्या पेरणी वेळी धाराशिव जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेर झाली होती. पुरेसा पाऊस नसल्यानं निम्मही सोयाबीन यंदा शेतकऱ्याच्या पदरी पडलं नाही. त्यातच आता रब्बी पेरीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली व शेतकऱ्यांनी पेरलेल्या हरभरा, गहू या पिकांना जीवदान मिळालं. मात्र त्या पिकाबरोबरच आता रब्बीत पेरलेलं सोयाबीनही उगवल्याने शेतकऱ्याचा मशागतीचा खर्च वाढला आहे. गहू, हरभारा या पिकातून सोयाबीन उपटून टाकण्याच्या खर्चात वाढ झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv News : पेरला गहू, हरभरा अन् उगवलं सोयाबीन; धाराशिवमधील शेतकरी हैराण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल