धाराशिव - सध्या नवरात्री सुरू आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आपण एका महिलेची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. या महिलेवर अनेक संकटे आली. पण ही महिला न खचता समाजासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले.
अॅडव्होकेट अमृता गाढवे असे या महिलेचे नाव आहे. त्या धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी मुलींना सक्षम बनवण्यासाठी लाठीकाठी प्रशिक्षण सुरू केले. इतकेच नाही तर निर्भया हेल्पलाइन देखील सुरू केली.
advertisement
समाजासाठी विविध उपक्रम करणाऱ्या अमृता गाढवे यांच्यावर अनेक संकट आली. गेल्या 6 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या एकटा पडल्या. मात्र समाजासाठी काम करण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण, जिजाऊ महिला मंडळ, निर्भया हेल्पलाइन, महिला व मुलींना योग प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, कायदेविषयक शिबिर, यासारखे विविध सामाजिक उपक्रम त्या राबवत असतात.
कोकणकन्येनं करुन दाखवलं!, दुबईत झाली घोषणा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शेफाली बनली पहिली "गल्फ सुपर शेफ"
आजही त्या भूम तालुका विधीज्ञ मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा अनेक सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला आहे. त्यांच्या या कार्याला लोकल18 च्या टीमचा सलाम.