कोकणकन्येनं करुन दाखवलं!, दुबईत झाली घोषणा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शेफाली बनली पहिली "गल्फ सुपर शेफ"
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
First Gulf Super Chef - रविवारी 6 ऑक्टोबरला सायंकाळी दुबई मध्ये झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये अंतिम 3 स्पर्धकांमध्ये शेफाली खांबकर निवडली गेली होती. या ग्रँड सोहळ्यात शेफाली खांबकर पहिली गल्फ शेफ बनल्याची घोषणा करण्यात आली.
सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वेंगुर्ल्याच्या शेफाली खांबकरला पहिली 'गल्फ सुपर शेफ' होण्याचा बहुमान मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी दुबईमध्ये झालेल्या एका ग्रँड सोहळ्यात 3 हजार स्पर्धकांमधुन शेफाली खांबकरच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
बिईंग मुस्कान आणि एसव्हीके यांच्या माध्यमातून दुबईमध्ये पहिल्या गल्फ सुपर शेफ या अत्यंत मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धमध्ये युएईमधील अनेक नामवंत शेफ सहभाग झाले होते. यूएईच्या विविध भागातून 3 हजारहुन अधिक शेफ यात सहभागी झाले होते.
advertisement
गेले काही दिवस सेलिब्रिटी शेफच्या उपस्थितीत विविध फेऱ्यांमधून पहिल्या सर्वोत्तम 12 शेफची निवड करण्यात आली. सलग 3 दिवस विविध फेऱ्यांमधून पहिल्या टप्प्यात 8 आणि नंतर अंतिम 3 शेफची निवड करण्यात आली. पंचतारांकित पदार्थांपासून स्ट्रीट फूड अशा विविध फेऱ्या जागतिक दर्जाच्या शेफकडून या स्पर्धेदरम्यान घेण्यात आल्या.
रविवारी 6 ऑक्टोबरला सायंकाळी दुबई मध्ये झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये अंतिम 3 स्पर्धकांमध्ये शेफाली खांबकर निवडली गेली होती. या ग्रँड सोहळ्यात शेफाली खांबकर पहिली गल्फ शेफ बनल्याची घोषणा करण्यात आली. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्या हस्ते शेफाली हिला गल्फ शेफ ट्रॉफी, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. गल्फमध्ये झालेल्या या पहिल्या भव्यदिव्य स्पर्ध्येत अव्वल ठरत एका कोकणकन्येने गल्फ मधील या मानाच्या चषकावर आपले नाव कोरल्यामुळे तिचे विशेष अभिनंदन होत आहे.
advertisement
शेफाली ही वेंगुर्ल्यातील पाटकर हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. गल्फमधील ही मानाची स्पर्धा जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना शेफालीने म्हटले की, "माझ्यासाठी ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. स्वप्न सत्यात उतरले आहे असे वाटत आहे. अर्थात या सगळ्यात माझे पती चेतन किन्नरकर, सासूबाई यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट होता. कोकणातील तुलनेने छोट्या पण सुंदर शहरातून मला सतत पाठबळ देणारे माझे आई वडील, बहिणीमुळे मी इथपर्यंत आले", अशा भावना शेफालीने व्यक्त केल्या.
advertisement
शेफाली वेंगुर्ल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी संध्या खांबकर यांची कन्या आहे. शेफालीच्या या यशानंतर मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या तिच्या आईवडिलांचेही विशेष अभिनंदन केले जात आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
October 11, 2024 3:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कोकणकन्येनं करुन दाखवलं!, दुबईत झाली घोषणा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शेफाली बनली पहिली "गल्फ सुपर शेफ"