4 एकर क्षेत्रातून मिळणार 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न, सोलापूरच्या शेतकऱ्यानं नेमकी कोणत्या पिकाची लागवड केली?

Last Updated:

solapur farmer success story -हे उत्पादन पुणे, मुंबई, सोलापूर आणि हैदराबाद या ठिकाणी विक्रीसाठी पाठवले जाते. याचे दर असेच राहिले तर 4 एकर मधून 10 लाख रुपये नफा मिळणार असल्याचेही शेतकरी गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.

+
सोलापूर

सोलापूर शेतकरी सक्सेस स्टोरी

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - शेतीमधून भरघोस उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्नशील असतो. चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी प्रचंड मेहनत करत असतो. अशाच एका शेतकऱ्याने आपल्या मेहनतीने काकडीची लागवड करुन तब्बल 40 दिवसात 1 लाख 50 हजार रुपये उत्पन्न मिळवले आहे. असाच दर राहिला तर त्यांनी 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याचबाबत लोकल18 चा हा स्पेशल रिपोर्ट.
advertisement
गंगाधर काशिनाथ म्हमाणे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल या गावातील रहिवासी आहे. गंगाधर म्हमाणे यांनी 4 एकर क्षेत्रामध्ये बेल्ली नाव असलेली काकडीची लागवड केली आहे. काकडीची लागवड 42 दिवसानंतर झाली असून आतापर्यंत दोन तोडणी या काकडीचे झाले आहे. या काकडी लागवडीला दीड लाख रुपयेपर्यंत खर्च आला असून पहिल्या तोडणीमध्ये काकडी लागवडीचा खर्च निघाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ज्वारीच्या बियाण्याचे असे होणार वितरण
ही काकडी पुणे, मुंबई, सोलापूर आणि हैदराबाद या ठिकाणी विक्रीसाठी पाठवले जाते. काकडीचे दर असेच राहिले तर 4 एकर मधून 10 लाख रुपये नफा मिळणार असल्याचेही शेतकरी गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
काय म्हणाले शेतकरी -
कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारा पीक म्हणजे काकडे आहे. लागवडीला आणि फवारणीला याला कमी खर्च येतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी काकडीची लागवड करून अधिकाधिक नफा मिळवावा, असे आवाहन शेतकरी गंगाधर म्हमाणे यांनी केले आहे.
मराठी बातम्या/कृषी/
4 एकर क्षेत्रातून मिळणार 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न, सोलापूरच्या शेतकऱ्यानं नेमकी कोणत्या पिकाची लागवड केली?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement