advertisement

सुरक्षेसाठी कॅमेरा बसवला अन् त्यानंच घात झाला, महिलेसोबत भयंकर घडलं, मुंबईत खळबळ

Last Updated:

Mumbai News: तेव्हा एक अनोळखी व्यक्ती लिफ्टमध्ये शिरला आणि तिच्या जवळ आला. ही घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

सुरक्षेसाठी कॅमेरा बसवला अन् त्यानंच घात झाला, महिलेसोबत भयंकर घडलं, मुंबईत खळबळ
सुरक्षेसाठी कॅमेरा बसवला अन् त्यानंच घात झाला, महिलेसोबत भयंकर घडलं, मुंबईत खळबळ
मुंबई: सध्याच्या काळात सुरक्षेसाठी अनेकजण सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात. परंतु, सुरक्षेसाठी बसविलेले हे कॅमेरेच एखाद्याच्या खासगी आयुष्याला धोका ठरू शकतात. साकीनाका परिसरातील एका गृहिणीला याचा धक्कादायक अनुभव आला आहे. सोसायटीतील लिफ्टमधील तिचा आणि एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोसायटी अध्यक्षाच्या मुलाविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
साकीनाका परिसरातील एका सोसायटीत 36 वर्षीय महिला कुटुंबीयांसह राहते. तिच्या तक्रारीनुसार, जानेवारी 2026 मध्ये सकाळी 10 च्या सुमारास ती इमारतीच्या लिफ्टमधून जात होती. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती लिफ्टमध्ये शिरला आणि तिच्या जवळ आला. ही घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
advertisement
भाजी मार्केटमध्ये गेल्यावर....
गृहिणी 9 मार्च रोजी सायंकाळी भाजी मार्केटमध्ये गेली होती. तेव्हा काही युवकांमध्ये एका व्हिडिओबाबत चर्चा ऐकू आली. तिने याबाबत चौकशी केली असता तिचाच लिफ्टमधला व्हिडिओ असल्याचे समजले. संबंधित सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजचा बॅकअप अध्यक्षांकडे आहे. परंतु, त्याचे तांत्रिक काम हा त्यांचा 25 वर्षांचा मुलगा पाहतो. त्यानेच परवानगीशिवाय व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
व्हिडिओ शेअर करणे गुन्हा
दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरे हे सुरक्षेसाठी असतात. मात्र, त्यातील रेकॉर्ड झालेले व्हिडिओ हे कोणाच्याही परवानगीशिवाय शेअर किंवा व्हायरल करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संवेदनशील मजकूर, व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
सुरक्षेसाठी कॅमेरा बसवला अन् त्यानंच घात झाला, महिलेसोबत भयंकर घडलं, मुंबईत खळबळ
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement