पळून जावून लग्न केलं, नवऱ्यानं सोडलं; तिच्यासोबत नको ते घडलं, पण संभाजीनगरात येताच आयुष्य बदललं!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: परक्या शहरात आलेल्या एका असहाय आईला छत्रपती संभाजीनगरने आधार दिला अन् तिचं आयुष्य बदललं.
छत्रपती संभाजीनगर: उत्तर प्रदेशातील बलरामपूरची ज्योती दुबे (वय 26) हिचे आयुष्य अचानक वादळात सापडले. प्रेमविवाह करून हरियाणात संसार थाटलेल्या ज्योतीच्या आयुष्यात काही वर्षे सुखाची गेली; मात्र नंतर संसारात मतभेद वाढत गेले आणि अखेर नवऱ्याने तिला दोन लहान मुलांसह वाऱ्यावर सोडले. पदरात दोन लेकरं आणि पोटात तिसरे बाळ अशा अवस्थेत जगण्यासाठी झगडणारी ज्योती कामाच्या शोधात रेल्वेने छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन पोहोचली.
अनोळखी शहर, हातात पैसे नाहीत, शरीराने थकलेली आणि गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात असलेली ज्योती रांजणगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बसली होती. तेव्हा एका संवेदनशील महिलेची तिच्यावर नजर पडली. तिने ज्योतीची विचारपूस करून तिला जेवण दिले आणि तिची माहिती बालकल्याण समितीपर्यंत पोहोचवली. त्यानंतर ज्योतीला शहरातील ‘शक्ती सदन’ या संस्थेत सुरक्षित आश्रय मिळाला.
advertisement
संस्थेत दाखल होताना ज्योतीला नववा महिना सुरू होता. काही दिवसांपूर्वीच तिने घाटी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. कठीण प्रसंगातही आईपणाची जबाबदारी सांभाळत ती नव्या आयुष्याची आशा मनात बाळगून आहे.
संस्थेच्या अधीक्षिका आम्रपाली बोर्डे यांनी सांगितले की, ज्योतीच्या दोन्ही मोठ्या मुलांना शिक्षणासाठी बालगृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवजात मुलीची काळजी ज्योती स्वतः घेईल. पुढील काही महिन्यांत ती पूर्णपणे सावरल्यानंतर तिला रोजगार मिळवून देण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
advertisement
परक्या शहरात आलेल्या एका असहाय आईला छत्रपती संभाजीनगरने दिलेला आधार हा केवळ मदतीचा नव्हे, तर माणुसकीचा हात असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 2:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पळून जावून लग्न केलं, नवऱ्यानं सोडलं; तिच्यासोबत नको ते घडलं, पण संभाजीनगरात येताच आयुष्य बदललं!









