advertisement

वयाच्या 68 व्या वर्षी अभिनेत्रीची पहिल्यांदाच मराठी मालिकेत एंट्री! तरुण नायिकांवर भारी पडणार 'बाई आजी'

Last Updated:

वयाच्या 68 व्या वर्षी भारती आचरेकर पहिल्यांदा मराठी मालिकेत काम करत आहेत. इतर तरुण नायिकांवर त्या नक्कीच भारी पडतील अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. 

News18
News18
मराठी टेलिव्हिजनच्या सगळ्या तरुण नायिकांना तगडी स्पर्धा देण्यासाठी 68 वर्षांची तरुण अभिनेत्री येत आहे. येऊदे कितीही अडचणीचं वारं... 'मी जिंकून घेईन सारं' म्हणत ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर या पहिल्यांदाच मराठी मालिकेत दिसणार आहेत. मी जिंकून घेईन सारं ही त्यांची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेतील त्यांची भूमिका जबरदस्त असून इतर मालिकांच्या तुलनेत नक्कीच वेगळी ठरणार आहे. भारती आचरेकर यांच्याभोवती ही मालिका फिरत असून त्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत.  वयाच्या 68 व्या वर्षी भारती आचरेकर पहिल्यांदा मराठी मालिकेत काम करत आहेत. इतर तरुण नायिकांवर त्या नक्कीच भारी पडतील अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे.
असं म्हणतात रक्ताच्या नात्यापेक्षा जोडली गेलेली नाती कधी कधी अत्यंत प्रिय असतात. ती आपल्यासाठी कुठलंही वादळ झेलून नेतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी असतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायला देखील मागं पुढे पाहत नाहीत. 'मी जिंकून घेईन सारं' ही नवी मालिका याच धाग्यावर आधारित आहे.
advertisement
या नव्या मालिकेतील छवी देखील अशीच आहे. रक्ताचं नातं नसलं तरीदेखील छवीसाठी बाई- आजी म्हणजे देवासमान आहेत… त्यांच्यासाठी आणि राजगुरू परिवारासाठी छवी काहीही करू शकते. पण, या कुटुंबाचे रक्षण करताना तिच्यासमोर अनेक अडथळे येणार आहेत, त्यांना ती कशी सामोरी जाणार ? कशी ते हे सगळ निभावून नेणार? हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
नुकताच या मालिकेचा प्रभावी प्रोमो आला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रोमोमधील सर्वात मोठं आकर्षण ठरते ते ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर. त्या बाई-आजी या अत्यंत वेगळ्या, ठाम आणि प्रभावी भूमिकेत प्रथमच मराठी मालिकेत दिसणार आहेत. कमी संवादांतूनच त्यांची स्क्रीन प्रेझेन्स, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि करारी बाणा ठसठशीतपणे जाणवतो.
advertisement
अत्यंत गोड, सोज्वळ आणि प्रत्येकाचं मन जिंकून घेणारी छवीची भूमिका जान्हवी तांबट साकारणार आहे. शांभवीची भूमिका अमृता फडके, वत्सला- वंदना वाकनीस, अनिकेत - संचीत चौधरी, साकेत - अमित रेखी आणि बेबी आत्या - दिशा दानडे हे देखील महत्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत. मी जिंकून घेईन सारं ही मालिका 16 मार्चपासून संध्या. ७वाजता कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
वयाच्या 68 व्या वर्षी अभिनेत्रीची पहिल्यांदाच मराठी मालिकेत एंट्री! तरुण नायिकांवर भारी पडणार 'बाई आजी'
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement