TRENDING:

हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा, धुळ्यात तिघांची हत्या; 'त्या' आक्षेपार्ह मेसेजने रक्ताचा पाट वाहिला

Last Updated:

वादातून लग्नस्थळी अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दीपक बोरसे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

धुळे : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात सुरू असलेल्या लग्नसमारंभात अचानक घडलेल्या भीषण चाकू हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान झालेल्या या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (ता. १९) दुपारी सुमारे एकच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हळदीच्या दिवशी  तयारी सुरू असताना हा राडा झाला.  साखरपुड्यात  साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटलेली होती. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण बनले होते. याच वादातून लग्नस्थळी अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

advertisement

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात

या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५) आणि सुरेशगीर सुरेश मोजगीर गोसावी (वय ५५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तसेच साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

advertisement

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

advertisement

संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेलसारखी येईल चवं, घरच्या घरी बनवा क्रिस्पी चिली पोटॅटो, रेसिपीचा सोपा Video
सर्व पहा

लग्नासारख्या आनंदोत्सवात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा, धुळ्यात तिघांची हत्या; 'त्या' आक्षेपार्ह मेसेजने रक्ताचा पाट वाहिला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल