advertisement

Crispy Chili Potato Recipe : हॉटेलसारखी येईल चवं, घरच्या घरी बनवा क्रिस्पी चिली पोटॅटो, रेसिपीचा सोपा Video

Last Updated:

घरच्या घरी चायनीज पदार्थांचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी क्रिस्पी चिली पोटॅटो ही डिश सध्या विशेष लोकप्रिय ठरत आहे. हॉटेलसारखी चव आणि कुरकुरीतपणा आता घरातही सहज मिळू शकतो.

+
घरच्या

घरच्या घरी बनवा हॉटेलसारखा कुरकुरीत ‘क्रिस्पी चिली पोटॅटो’

मुंबई : घरच्या घरी चायनीज पदार्थांचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी क्रिस्पी चिली पोटॅटो ही डिश सध्या विशेष लोकप्रिय ठरत आहे. हॉटेलसारखी चव आणि कुरकुरीतपणा आता घरातही सहज मिळू शकतो. कमी वेळात आणि सोप्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे.
क्रिस्पी चिली पोटॅटो साहित्य:
बटाट्यांसाठी:
    advertisement
  • 3–4 मोठे बटाटे
  • 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • advertisement
  • 2 टेबलस्पून मैदा
  • मीठ चवीनुसार
  • ½ टीस्पून मिरीपूड
  • advertisement
  • तळण्यासाठी तेल
  • ग्रेवीसाठी:
    • 1 टेबलस्पून तेल
    • advertisement
    • 1 टेबलस्पून लसूण (बारीक चिरलेला)
    • 1 टेबलस्पून आले (बारीक चिरलेले)
    • advertisement
    • 2 हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
    • 1 मध्यम कांदा (चौकोनी तुकडे)
    • advertisement
    • 1 शिमला मिरची (चौकोनी तुकडे)
    • 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस
    • 1 टेबलस्पून लाल तिखट सॉस
    • 1 टीस्पून सोया सॉस
    • मीठ चवीनुसार
    • सजावटीसाठी पात कोथिंबीर किंवा स्प्रिंग ऑनियन
    • क्रिस्पी चिली पोटॅटो कृती
      बटाटे तयार करा:
      • बटाटे सोलून लांबट (फिंगर चिप्ससारखे) कापा.
      • 10 मिनिटे थंड पाण्यात भिजत ठेवा.
      • नंतर पाणी काढून स्वच्छ कापडाने कोरडे करा.
      • त्यात कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ आणि मिरीपूड आणी मसाले  घालून हलकेच मिक्स करा.
      • तळणे:
        • कढईत तेल गरम करून बटाटे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
        • जास्त कुरकुरीतपणासाठी डबल फ्राय करा (पहिल्यांदा हलके तळा, नंतर पुन्हा तळा).
        • ग्रेवी तयार करा:
          पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करा. त्यात लसूण, आले आणि हिरव्या मिरच्या परता. कांदा आणि शिमला मिरची घालून 1–2 मिनिटे परता (क्रंच राहील असा). आता टोमॅटो सॉस, लाल तिखट सॉस, सोया सॉस, आणि मीठ घाला. सॉस घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून हलवा. तळलेले बटाटे सॉसमध्ये टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा. वरून स्प्रिंग ऑनियन किंवा कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
          खास टिप्स:
          अधिक कुरकुरीतपणासाठी बटाटे 5–10 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून मग तळा. तिखटपणा आपल्या आवडीनुसार वाढवा किंवा कमी करा. सर्व्ह करताना वरून तीळ शिंपडले तर चव अधिक छान लागते. गरमागरम क्रिस्पी चिली पोटॅटो चहा किंवा सूपसोबत सर्व्ह करा आणि घरच्यांसोबत चायनीज पार्टीचा आनंद घ्या! 
          view comments
          मराठी बातम्या/रेसिपी/
          Crispy Chili Potato Recipe : हॉटेलसारखी येईल चवं, घरच्या घरी बनवा क्रिस्पी चिली पोटॅटो, रेसिपीचा सोपा Video
          Next Article
          advertisement
          दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
          दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
          • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

          • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

          • 35,000 कोटींची बंपर खरेदी

          View All
          advertisement