Post Office Scheme : सोन्यासारखं रिटर्न देते ही सरकारी स्किम! 1 लाखांवर मिळेल 45,000 रुपयांचं व्याज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या काळात लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात रस दाखवत आहेत. पण तुम्हाला माहितीये का, की पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक स्किम्स आहेत. ज्यामध्ये खुप चांगलं रिटर्न मिळतं.
आपली बचत ज्यांना गुंतवायची आहे. त्यांच्यासाठी अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. खरंतर रिस्क फ्री स्थिर उत्पन्न हवे असणाऱ्या लोकांसाठी पोस्ट ऑफिसद्वारे सादर केल्या जाणाऱ्या बचत योजना एक चांगला ऑप्शन आहे.या योजना सरकार समर्थित आहेत आणि तुमचे पैसे सुरक्षित आहेत याची खात्री करतात. म्हणूनच बरेच लोक पोस्ट ऑफिस योजना निवडतात. पोस्ट ऑफिसने देऊ केलेली एक योजना कमी कालावधीत चांगले व्याजदर देऊन लोकांना आकर्षित करते. ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना आहे. तुम्ही 1 लाख रुपये जमा करू शकता आणि 44,995 रुपये व्याज मिळवू शकता.
advertisement
पोस्ट ऑफिसची ही टाइम डिपॉझिट स्किम बँकेच्या एफडी योजनेप्रमाणे आहे. ही सरकारद्वारे दिली जाणारी एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये तुम्ही एक फिक्स्ड कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करु शकता. कारण ही योजना केंद्र सरकारच्या आदेशानुसार संचालित आहे. यामुळे तुमची गुंतवणूकपूर्णपणे सुरक्षित राहील. चला या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
चक्रवाढ व्याज: पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटवरील व्याज तिमाही मोजले जाते. याचा अर्थ असा की दर तीन महिन्यांनी तुमच्या मुद्दलात व्याज जोडले जाते. परिणामी, तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळते. शेवटी, मुदतीच्या शेवटी तुम्हाला जास्त रिटर्न मिळेल. तुम्ही प्रत्येक वर्षाच्या शेवटी तुमच्या बचत खात्यात मिळवलेले व्याज जमा करू शकता. तुम्ही व्याज काढले नाही, तर ते जमा होत राहील आणि मुद्दलात जोडले जाईल. मुदतपूर्तीनंतर, तुम्ही मुद्दल आणि व्याज दोन्ही एकत्र काढू शकता.
advertisement
1 लाख रुपयांवर 44,995 रुपयांचं व्याज : तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत 5 वर्षांसाठी 1,00,000 रुपये जमा केले. तर तुम्हाला चांगला फायदा मिळेल. व्याजदर 7.5% (त्रेमासिक चक्रवृद्धी म्हणजेच - Quarterly Compound Interest) असल्यामुळे, मॅच्योरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 1,44,995 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला मिळणारं शुद्ध व्याज 44,995 रुपये असेल.
advertisement
advertisement
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्किम सर्व तरुण वर्गातील लोकांसाठी समान व्याजदर प्रदान करते. वरिष्ठ नागरिकांसाठी कोणताही अतिरिक्त लाभ नाही. या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी केलेल्या गुंतवणूक आयकर अधिनियमच्या कलम 80C अंतर्गत कपात पात्र आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये हे अकाउंट ओपन करुन यात पैसे जमा करु शकता.







