विधानसभा निवडणूक निकालानंतर लगोलग ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर म्हात्रे यांच्या प्रवेशाने चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी दीपेश म्हात्रे यांनी जोरदार तयारी केली असून निवडणुकीत यश मिळविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी राजू पाटील यांच्या साथीची गरज असल्याचे ते म्हणाले.
advertisement
आमच्यासोबत या, एकत्रित येऊन शहराला चांगले कारभारी देऊ
भाजप कल्याण-डोंबिवलीत ज्या प्रकारे काम करीत आहे, त्याने शहर विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. राजू पाटील आमच्यासोबत आले तर एकत्रित येऊन शहराला चांगले सरकार देऊ, असे दीपेश म्हात्रे म्हणाले.
किती दिवस विरोधात राहणार, सत्ता द्या, काही लोक मिंधे झालेत, पाठीचा कणा राहिलेला नाही- राजू पाटील
आम्ही किती दिवस विरोधात राहणार, शेवटी शहराचा विकास करण्यासाठी सत्ता लागते. जिथे विरोध करायचा तिथे विरोध करतोच. पण काही लोकांना पाठीचा कणा राहिलेला नाही. अनेक जण मिंधे झालेत. इथले सगळे राजकारणी सरपटणारे प्राणी झालेत, त्यांना आत्मसन्मान राहिलेला नाही, असे राजू म्हणाले.
