TRENDING:

5 वर्ष जगण्यामरण्याच्या आणाभाका, मग ऐनवेळी डॉक्टर प्रेयसीने भावी पोलीस बॉयफ्रेंडला झटक्यात संपवलं

Last Updated:

हत्येचं प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून तरूणीने स्वतः वर चाकूने वार करत हल्ल्याचा बनाव देखील केला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : नातेवाईक असलेल्या प्रेयसीने लग्नाचा तगादा लावलेल्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून तरूणीने स्वतः वर चाकूने वार करत हल्ल्याचा बनाव देखील केला. मात्र तरुणीचा बनाव पोलिसांच्या तपासात उघडकीस आला असून तिनेच हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत हत्याकांड समोर आलं आहे.
News18
News18
advertisement

नांदेड जिल्ह्यातील नातेवाईक असलेला प्रियकर आणि प्रेयसी नागपूरमध्ये रोजगाराच्या शोधत आले होते. प्रेयसी BAMS च्या अखेरच्या वर्षाला तर मृतक प्रियकर बालाजी कल्याण पोलीस पोलीस भरतीसाठी तयारी करत होता. दोघांचे गेल्या पाच वर्षापासून प्रेम संबंध होते, मात्र गेल्या काही दिवसात प्रियकराने प्रेयसीच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. प्रेयसीच्या वडिलांना फोन करुन लग्न लवकर लावून द्या अन्यथा माझ्या अंत्यसंस्कारासाठी तुम्हाला नागपूर यावं लागेल असा अलटीमेटम दिला होता, या घडलेल्या प्रकारामुळे प्रेयसी प्रचंड संतापली होती.

advertisement

दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला?

बुधवारी रात्री प्रेयसी प्रियकराच्या रूमवर गेली होती. मृतक बालाजी आणि त्याचा रूम पार्टनर तिघांच्या रात्री उशिरापर्यंत गप्पा झाल्या. त्यानंतर मृतक बालाजी आणि प्रेयसी एका रूममध्ये गेले. काही वेळानंतर रूम मधून ओरडण्याचा आवाज आल्याने मित्रांने रूम चा दरवाजा ठोठावला, मात्र प्रेयसीने दरवाजा उघडला नाही. 20 मिनिटांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा दोघेपण रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडून असल्याचं दिसलं. मित्राने घरमालकाच्या मदतीने दोघांना पण उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बालाजीला तपासून मृत घोषीत केले तर जखमी प्रेयसीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

advertisement

प्रेयसीचं बिंग कसं फुटलं? 

नंदनवन पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते मृतक प्रियकराच्या अंगावर चाकूच्या काही खोल जखमा होत्या त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला असावा यातून प्रियकराची हत्या झाल्याचा पोलिसांना शंका होती. मात्र आपल बिंग फुटू नये म्हणून प्रेयसीने प्रियकराने माझ्यावर हल्ला करत स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या केल्याचा बनाव केला. प्रेयसी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तिच्यावर दडपण येऊ नये म्हणून पोलिसांनी सुरुवातीला तांत्रिक तपस केला. मात्र मृतक प्रियकराच्या अंगावरील खोल जखमांमुळे पोलिसांना दाट संशय प्रेयसीवर होता. अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यावर प्रेयसीने हत्या केल्याची कबुली दिली.

advertisement

प्रेयसीवर हत्येचा गुन्हा दाखल 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि मक्याची पुन्हा दर वाढ, कांद्याला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

प्रेयसीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर पोलीस तिला ताब्यात घेतील. मात्र गेली 5 वर्ष प्रेमाच्या आणाभाका घेत असताना प्रेयसीने अशा प्रकारे आपल्या प्रियकराची हत्या केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. मृतक बालाजी कल्याण च्या भावाच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये प्रेयसीवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
5 वर्ष जगण्यामरण्याच्या आणाभाका, मग ऐनवेळी डॉक्टर प्रेयसीने भावी पोलीस बॉयफ्रेंडला झटक्यात संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल