इथं शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचे बॅनर लागले आहेत. संबंधित बॅनरवर निकालाआधीच शिंदे गटाचे उमेदवार विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल दोघांचं अभिनंदन केलं आहे. स्थानिक कार्यकर्त्यांकडून अशाप्रकारे बॅनर लावून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
'वाघाचा दरारा कायम' असा मजकूर देखील या बॅनरवर लिहिला आहे. निकालाआधीच डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या विजयाचे बॅनर झळकल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी म्हात्रे दाम्पत्यावर मोठा विश्वास दाखवला होता. प्रभाग क्रमांक २२ ड मधून शिंदेंनी विकास म्हात्रेंना उमेदवारी दिली होती. तर २२ क मधून कवित्रा म्हात्रेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. आता दोघांच्या विजयाचे बॅनर लागले असून प्रत्यक्ष निकालात काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
122 नगरसेवक असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत सुरुवातीपासून महायुतीत रस्सीखेच बघायला मिळत होती. इथं जागावाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात खटके उडाले होते. पण अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार, दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली.
