विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांचा निरोप समारंभ सभागृहात पार पडला. उद्धव ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना शिंदे गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी अजित पवार गट), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप), दादाराव केचे (भाजप), रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप) आणि संजय केनेकर (भाजप) या ९ आमदारांची विधान परिषदेतील सदस्यत्वाची मुदत संपली. या सदस्यांच्या भावी आयुष्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. विशेष करून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शिंदे काय बोलतात, याकडे अनेकांचे लक्ष होते.
advertisement
एकनाथ शिंदेंनी गुडबाय कसं केलं?
एकनाथ शिंदे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या सभागृहातून निवृत्त होत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठीही एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा 'साहेब' असा विशेष उल्लेख केला.
एकनाथ शिंदे यांची चारोळी, उद्धव ठाकरेंकडून नमस्कार
निरोप देताना कुणाबद्दलही वाईट बोलायचे नसते. कोणत्या ना कोणत्या कारणाने सगळ्यांची भेट होणारच आहे. ओ जानो वालो हो सके तो लौटके आणा, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी चारोळी म्हटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला.
एकनाथ शिंदे यांच्याकडून सदस्यांना खास शुभेच्छा
राजेश राठोड- राजेश राठोड यांच्या सारख्या विरोधकांमध्ये आवश्यकता असते. राजेश राठोड यांनी जनतेच्या हितासाठी त्यांच्या कार्यकाळात काम केले.
संदीप जोशी- संदीप जोशी नागपूर महापौर राहिले आहेत. त्यांनी मागे राजकारणातून निवृत्त घेतली होती. आता पुन्हा त्यांनी निर्णयाचा फेरविचार करून सहा महिन्याचा ब्रेक घेण्याचे ठरवले.
दादाराव केचे- दादाराव साधेपणा हीच तुमची ओळख आहे. तुमची सर्वसामान्यांशी नाळ जोडली आहे. तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा तुमचा प्रयत्न असतो, दादाराव तुम्हाला खास शुभेच्छा
