TRENDING:

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

Last Updated:

Maharashtra CM Oath Ceremony : शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खरं तर शपथविधीला एक तास बाकी असताना देखील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री स्विकारण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ दे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांनी एकनाथ शिंदे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
advertisement

खरं तर शपथविधीला एक तास बाकी असताना देखील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा आग्रह आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्या शिष्टाईंनंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाले. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी जरी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले असले तरी खाते वाटपावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शपथविधीसोहळ्यानंतर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

advertisement

आम्ही शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या वतीने एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी कळकळीची विनंती केली होती. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिंदे देखील सरकारमध्ये असावेत अशी आमची भूमिका होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्याबाबत विनंती केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

शिंदे यांनी मान्य केल्यानंतर आम्ही सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आलो होतो. येथून उपमुख्यमंत्रिपदाच्या शिफारसीचे पत्र घेऊन आम्ही राजभवनावर गेलो. आता ते पत्र आम्ही राज्यपालांकडे सुपूर्द केले आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. अखेर त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेचा मार्ग मोकळा झाला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल